Solapur : सोलापुरात सिध्दरामेश्वरांचा अक्षता सोहळा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम
Solapur : सिध्दरामेश्वर यांचा अक्षता सोहळा यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
Solapur : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे (Solapur) ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर (Siddheshwar Maharaj Yatra) यांच्या यात्रेला सुरुवात झाली. यात्रेचं मुख्य आकर्षण हे सिध्दरामेश्वरांचा विवाह सोहळा आहे. सिध्दरामेश्वर यांचा अक्षता सोहळा यावर्षी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, पोलीस आयुक्त हरीश बैजल आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
एका कुंभाराची कन्या सिद्धेश्वर महाराजांची भक्त होती आणि ती त्यांच्यासोबत विवाह करू इच्छित होती. मात्र महाराज हे योगीपुरूष असल्यामुळे त्यांनी कुंभार कन्येला स्पष्ट नकार दिला. मात्र भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या योग दंडाबरोबर विवाह करण्यास सांगितले. तेथूनच हा विवाह सोहळा साजरा केला जातो. आगळ्या वेगळ्या या विवाह सोहळ्यात सिध्दरामेश्वरांचे भक्त पांढऱ्या रंगाचा पोषाख परिधान करतात. बारा बंद असल्यानं या पोषाखाला बारा बंदी म्हणतात. बाराबंदीचा मानही आठरा पगड जातीला मिळतोय. समजातल्या सर्व जाती धर्मांना या यात्रेत सामवून घेतल जात. कुठलाही भेदभाव, कुठल्याही निमंत्रणाशिवाय लोक या यात्रेला हजेरी लावतात. यात राजकीये नेतेदेखील मागे नसतात. सोहळ्यासाठी शहरातल्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढत सिध्देश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक केला जातो. त्यानंतर अक्षदा सोहळ्यादिवशी सम्मती कट्ट्यावर योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह लावला जातो. यासाठी सिध्देश्वरांचे आणि कुंभार कन्येचे वंशंजांना पुजेचा मान मिळतो. समाजातल्या सर्व लोकांच्या सम्मतीनं हा विवाह सोहळा पार पडतो. डोळ्याच पारण फेडणाऱ्या या विवाह सोहळ्याला पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक कुठल्याही निमंत्रणाशिवाय हजेरी लावतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पार पडत असलेल्या या यात्रेत केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मुंबई महापालिकेची वाढवलेली प्रभाग संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारीत
- भाजपचे नेते हैदर आझमी यांची पत्नी रेश्मा खानला दिलासा, अटक झाल्यास जामिनावर सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा