एक्स्प्लोर
विदर्भवाद्यांवर हात उगारल्यास सहन करणार नाही, अणेंचा इशारा
वर्धा : “वेगळ्या विदर्भाची लढाई ही गांधीजींच्या विचाराने चालवली जाईल. मात्र, कोणीही विदर्भवाद्यांवर हात उगारला, तर आम्ही गांधींजींनी संगीतल्याप्रमाणे दुसरा गाल पुढे करणार नाही. आम्ही सहन करणार नाही.”, असा इशारा श्रीहरी अणेंनी वर्ध्यात दिला.
वर्धा जिल्ह्यातील आर्वीत काल विदर्भाची दशा आणि दिशा यावर माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
“सरकार म्हणजे दुसरं सावकार”
आमदारांची पगारवाढ आणि विदर्भातील शेतकरी यावर प्रश्न विचारला असता त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. अणे म्हणाले, “ हे सरकार म्हणजे दुसरं सावकार आहे”
“एकीकडं शेतकरी मारतोय, अशी परिस्थिती असताना आमदारांनी पगारवाढ करुन घेतली. पगार वाढवणारं सरकार आमदार ज्यांनी ही वाढ स्वीकारलीय ही बाब लांच्छनास्पद आहे.“ असेही श्रीहरी अणे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement