एक्स्प्लोर

Pune News: कधी सॉप्टवेअर काम करत नाही तर कधी बायोमेट्रिक नोंदणी होत नाही; रेशन न मिळाल्याने दुकानदार आणि कार्डधारक दोघेही त्रस्त

ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने रेशनवरील धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प आहे. कोणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रशासकीय यंत्रणेत अशी परिस्थिती असल्याचं संघटनांनी म्हटलं आहे.

Pune News: दर महिन्याला रेशन दुकानात 20 तारखेनंतरच धान्य मिळते. आता रेशनवर धान्य आले पण मशीन खराब आहे. मशिनवर अंगठा लावला तरी त्याची नोंदणी होत नाही. अशा तक्रारी रेशन कार्ड धारकांकडून केल्या जात आहेत. अनेक  रेशन कार्ड धारकांच्या अशाच तक्रारी आहेत. ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चार दिवसांपासून धान्य वितरणसुद्धा ठप्प आहे. याचा फटका गरीब नागरिकांना बसत आहे.

राज्यातील रेशन दुकाने ई-पॉस मशीनवर रेशन कार्ड धारकांची बायोमेट्रिक नोंदणी करून धान्य वितरण करतात. परंतु नुकतंच ई-पॉस मशीनवर नवीन सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या वितरणातील त्रुटींमुळे ऑगस्टमध्ये रेशन दुकानांवर धान्य उशिराने उपलब्ध झाले. पुन्हा ई-पॉस मशीनवरील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. बायोमेट्रिक नोंदणी मशीनवर केली जाते. मात्र धान्य दिल्याची पोचपावती नाही. अशा परिस्थितीत रेशन दुकानदारांसमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे पुणे शहर, जिल्हा आणि इतर अनेक शहरांमध्ये धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

पुणे विभागातील रेशन दुकाने आयएसओ प्रमाणित आहेत. सर्व्हर डाऊन आणि सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होतच राहतो. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून नीट उत्तरे मिळत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रकरण निकाली काढावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने केली आहे.

यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यात आला.  तांत्रिक समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ई-पॉस मशीनसाठी नवीन सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. नवीन सर्व्हरवर अपलोडिंगचं काम सुरु असल्यामुळे ही समस्या होत आहे. लवकरच ही समस्या दूर होईल, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प
ई-पॉस मशिनच्या सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने रेशनवरील धान्य वितरण चार दिवसांपासून ठप्प आहे. कोणीही अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाही. प्रशासकीय यंत्रणेत अशी परिस्थिती आहे, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Sunil Shelke EXCLUSIVE : Rohit Pawar Jayant Patil लवकरच सत्तेत सहभागी होतील; शेळकेंचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 03 March 2025Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
दुचाकीला वाचविताना ST बस पलटी; भीषण अपघातात 36 जखमी, 6 गंभीर तर दोघांचे हात तुटले
Rohit Pawar : मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
मी कुठेतरी कमी पडत असेल म्हणून संधी नाही, नाराज रोहित पवारांचा रोख कुणाकडे? 
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
तिरुपतीप्रमाणेच पंढरीच्या विठुरायाचे टोकन दर्शन; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांचे हस्ते पहिले पूजन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरण; गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी, पुणे पोलिसांकडून मकोका
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.