एक्स्प्लोर
परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ड्रीम प्रोजेक्टला घरघर, शिवशाही बसला उतरती कळा
एसटी महामंडळाच्या शिवशाही बससेवेला विविध कारणांमुळे उतरती कळा लागल्याचं चित्र आहे.
उस्मानाबाद : महामंडळाच्या शिवशाही बससेवेला विविध कारणांमुळे उतरती कळा लागल्याचं चित्र आहे. पाच वर्षाच्या करारावर एसटीने सात कंपन्यांच्या मिळून 576 बस चालवायला घेतल्या होत्या. त्यातील रेन्बो कंपनीने 25, अरोन कंपनीने 100, भागिरथी कंपनीने 88 बसगाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या स्वत:च्या मालकीच्या 498 बस शिवशाही झाल्या होत्या. एकूण सातपैकी दोन कंपन्यांनी आधीच माघार घेतली. आता आणखी एका कंपनीने शिवशाही बंद केली आहे.
एसटीची थकबाकी वेळेवर मिळत नाही, तसंच नियम मोडल्यानंतर होणारे दंड, बँकांची थकलेली देणी, तोटा यामुळे खाजगी कंपन्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. खाजगी शिवशाहींची संख्या आता 576 वरुन 363 झाली आहे. उस्मानाबाद आगारात 4 बसेस आणि तुळजापूर आगारातून आलेल्या 2 बसेस अशा एकूण सहा बसेस उस्मानाबादमधून पुणे मुंबईसह मोठ्या शहरांकडे प्रवासी वाहतूक करत आहे.
सुरुवातीला प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली वातानुकूलित शिवशाही आज लोकांना नकोशी वाटत आहे. कारण ही बस इच्छित स्थळी पोहचण्यास जास्त वेळ लावते आणि भाडेही जास्त आकारत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
शिवशाहीला घरघर लागण्याची कारणं
- नियोजनाचा अभाव
- ठेकेदाराची मनमानी
- अधिकाऱ्यांचे ठेकेदाराशी असलेले हितसंबंध
- शिवशाही बसेस देखभाल, दुरुस्ती याकडे ठेकेदाराचं होणार दुर्लक्ष
- ठेकेदाराच्या चालकाची मनमानी, कुठेही बस थांबवणे, प्रवाश्यांशी उर्मट भाषेत बोलणे, एसटी कर्मचाऱ्यांशी उद्धट भाषा वापरणे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement