एक्स्प्लोर

नागपुरात शिवसेनेचे व्हिडिओ क्लिपमधून भाजपवर बाण

नागूपर : ''खंडणीखोर गुंडांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा, कुख्यात गुंडाला गडकरी वाड्याचा आशीर्वाद आणि नागपुरात सत्तेच्या मोहाने गुंडांचा भागवत'', असे एक ना अनेक तिक्ष्ण शाब्दिक बाण सोडणारी शिवसेनेची व्हिडिओ क्लिप नागपुरात भाजप नेत्यांना लालबुंद करत आहे. नागपुरातील विशिष्ट प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांनी एक व्हिडियो क्लिप प्रचारात आणली आहे. मुंबईतून नागपूरला शिकायला चाललेल्या एका युवती आणि तिच्या पालकांच्या मनातील भावना या व्हिडिओ क्लिपमधून मांडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांना कसा पाठिंबा देतात, गडकरी वाड्याचा गुंडांवर कसा हात आहे, हे पटवून देण्याचं काम शिवसेनेने या व्हिडिओ क्लिमधून केलं आहे. खासकरून महिला मतदारांना नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेची अवस्था समजावून सांगितली जात आहे. शिवसेनेच्या व्हिडिओ क्लिपमध्ये नागपूरची अतिरंजित स्थिती दाखवल्याचा भाजपचा आरोप आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नावं वापरून आणि संघ प्रमुखांचं नाव वापरून शिवसेनेने मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपने केलाय. विशेष म्हणजे नागपुरात यंदा भाजपने काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना उमेदवारी नाकारली आहे. मात्र अशा उमेदवारांना शिवसेनेने भगवा हातात सोपवत संधी दिली आहे. भाजपने नाकारलेल्या अनिल धावडे या गुन्हेगार पार्श्वभूमीच्या नेत्याला शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामुळे धावडेसारखे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार शिवसेनेला कसे चालतात, असा सवाल भाजपने केला आहे. राजकारणातील गुंड या विषयावरून सर्वत्र 'महाभारत' सुरु आहे. सर्वच पक्ष दुसऱ्या पक्षावर गुंडाला आश्रय दिल्याचा, त्याची मदत घेतल्याचा आरोप करत आहेत. शिवसेनेने तर भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात याच मुद्द्यावर घेरलं आहे. मात्र शिवसेनेची ही प्रचाराची व्हिडिओ क्लिप दोन्ही मित्र पक्षांमधल्या संघर्षाचा मुद्दा बनली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?

ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं

पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर

दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू

Embed widget