एक्स्प्लोर
बाळासाहेबांऐवजी मोदींचा फोटो लावण्यास नकार दिल्यामुळे शिवसैनिकाला नोकरीवरून काढले
पुणे महानगरपालिकेच्या एका बागेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मोहन यादव यांनी त्यांच्या रथावर बाळासाहेबांच्या फोटोऐवजी मोदींचा फोटो लावण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी मान्य न केल्याने त्यांना काम सोडून घरी जावं लागलं.
पंढरपूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी आपल्या मोटारसायकलचाच रथ बनवून एकेकाळी त्यांच्या सभांना हजेरी लावणाऱ्या शिवसैनिकाला याच रथामुळेच आपली नोकरी गमवावी लागली. पुणे महानगरपालिकेच्या एका बागेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मोहन यादव यांनी त्यांच्या रथावर बाळासाहेबांच्या फोटोऐवजी मोदींचा फोटो लावण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी मान्य न केल्याने त्यांना काम सोडून घरी जावं लागलं.
दौंड तालूक्यातील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या मोहन यादव यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अफाट श्रद्धा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर त्यांचे देवापेक्षा जास्त प्रेम आणि म्हणूनच साहेबांची एकही सभा ते चुकवत नसत. प्रत्येक सभेला जाण्यासाठी अडचणी येऊ लागल्यावर 20 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मोटारसायकलचाच रथ बनवुन घेतला आणि हाच रथ घेऊन ते सभास्थानी पोहचू लागले. यासाठी कोणी मदत केली तर ठिक नाहीतर आपल्या प्रपंचाला कात्री लावून ते या सभांना हजर होतात. बाळासाहेबांना एकदा भेटावे ही इच्छा मनात घेऊन एकदा ते थेट मातोश्रीवर आपला रथ घेऊन पोचले होते. बाळासाहेबांनी खाली येऊन या अनोख्या रथाचे कौतुक देखील केले होते. बाळासाहेबांनंतर मोहन आता उद्धव ठाकरे यांच्या सभांना हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा मोहन देखील हा रथ घेऊन अयोध्येला पोचले होते.
गेल्या 10 वर्षांपासून मोहन पुण्यात महानगरपालिकेच्या एका बागेत कंत्राटी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मोहन यांच्या रथावर त्यांनी 'बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून फिरावे', असे त्यांना एका भाजप आमदाराच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यावर 'मेलो तरी बाळासाहेबांचा फोटो निघणार नाही', असे उत्तर मोहन यांनी त्या भाजप कार्यकर्त्यांना दिलं होतं. मात्र या प्रसंगानंतर मोहन यांना आपली नोकरी गमवावी लागली.
मोहन यांनी ही गोष्ट त्यांनी शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी प्रशासनाला संपर्क करुन पाहिला मात्र सेनेच्या मंत्र्यापेक्षा पुण्यातील भाजप आमदाराचे वजन जास्त पडल्याने मोहन यांना कुटूंबासह बेकार व्हावं लागलं.
सध्या मोहन एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत. आयुष्यभर मोहन यांनी शिवसेनेवर केलेल्या प्रेमाला न्याय देऊन भाजपने घालवलेली हक्काची नोकरी शिवसेना परत मिळवून देईल का? हाच प्रश्न आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement