एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : खोके सरकार विरोधात आम्ही मशाल पेटवलीय; चिन्हं मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Aaditya Thackeray : मशाल घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ, यश शिवसेनेच्या बाजूनेच मिळेल, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

मुंबई : ठाकरे गटाला (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केलाय. खोके सरकार विरोधात आम्ही मशाल पेटवलीय, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. "अभिमानाने हे नाव आणि चिन्ह देशात आणि राज्यात घेऊन जाणार ओहोत. आमच्या नावात  बाळासाहेब नाव आहे. धगधगती मशाल लोकापर्यंत पोहचविणार आहे. पण नाव आणि चिन्ह चोरण्याचं काम काही जण करतायत, अशी घणाघाती टीका आदित्य टाकरे यांनी शिंदे गटावर केलीय. 

आदित्य ठाकरे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळावर मशाल आहे, हुतात्मा चौकात धगधगती मशाल आहे. तीच मशाल घरोघरी पोहोवू. शिवाय धनुष्यबाणाची लढाई आम्ही पुढे कशी लढायची ती लढू. खोके सरकार म्हणून त्यांची ओळख आहे. खोके सरकार विरोधात आम्ही आता मशाल पेटवली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.  

नवं चिन्ह मिळाल्यानंतर यश शिवसेनेच्याच बाजुने मिळेल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ही मशाल घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जाऊ, यश शिवसेनेच्या बाजूनेच मिळेल. 40 लोकांची जी गद्दारी झाली आहे, त्यांचं पुढे काय होणार? कारण हा प्रश्न आता देशाचा झाला आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. 

शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, कुठलेही नाव घेण्याचा प्रयत्न करा, पण खोके सरकार 50 खोके एकदम ओके हे सर्वांना माहिती आहे. 

 उद्धव ठाकरे गटाला ' शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक मशाली पेटवून आनंदोत्सव साजरा करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या

Shivsena : ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव, तर शिंदे गट आता 'बाळासाहेबांची शिवसेना' 

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : धगधगत्या मशालीने घडविला होता इतिहास, शिवसेना अन् मशालीचं नात जुनंच 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage Thane News: एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, 'या' नंबरवर फोन करा अन्...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Nagpur News : नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
नागपुरात मुलं चोरणारी टोळी सक्रिय, सोशल मीडियावर अफवांचा पेव फुटला, गैरसमजुतीतून वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी मारलं, थोडक्यात बचावले प्राण
Solapur Accident : सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget