एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाकरे घराण्यातील मुख्यमंत्री सत्तेत असताना शिवसेनेचा वर्धापन दिन, शिवसैनिकांना आनंदाची पर्वणी!
शिवसेनेने गेल्या 54 वर्षात अनेक स्थित्यंतरं पाहिली. पण 2019-20 हे वर्ष मात्र ऐतिहासिक ठरलं.ठाकरे परिवारातील सदस्य उद्धव ठाकरेंच्या रुपाने थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान झाला. हे वर्ष शिवसैनिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलं.
मुंबई : आज शिवसेनेचा 54 वा वर्धापन दिन. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा आज 54 वा वर्धापन दिन आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्यामुळे, दरवर्षीप्रमाणे या वर्षी शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा सामुहिकरित्या साजरा होणार नाही. त्या ऐवजी शिवसैनिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तळागाळात प्रयत्न करावेत. शिवसेना शाखेत आधीपासूनच रुग्णांची तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. तसंच इतर गरजूंनाही मदतीचं सत्र सुरुच ठेवण्याचं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
शिवसेना: देशातील एक महत्वाचा प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून ओळख
शिवसेनेची देशातील एक महत्वाचा प्रादेशिक राजकीय पक्ष म्हणून ओळख आहे. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली. मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या पक्षाची धुरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे. शिवसेनेने 1989 साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षा बरोबर युती केली. 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात 1999 साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. 2014 साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले. 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला अन् शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री झाले.
शिवसेनेने गेल्या 54 वर्षात अनेक स्थित्यंतरं पाहिली. पण 2019-20 हे वर्ष मात्र ऐतिहासिक ठरलं. ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणात उतरले. पहिल्यांदाच ठाकरे परिवारातील सदस्याने विधानसभेची निवडणूक लढवली. ते जिंकले. नंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आणि ठाकरे परिवारातील सदस्य उद्धव ठाकरेंच्या रुपाने थेट मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान झाला. हे वर्ष शिवसैनिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलं.
आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार संबोधन
बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय व हक्कांसाठी म्हणत स्थापन केलेल्या शिवसेनेनं गेल्या 54 वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आपला दबदबा सिद्ध केलाय. 1995 च्या युती सरकार नंतर आज 25 वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे. त्यामुळे या वर्षी शिवसेनेनं मोठ्या जल्लोष सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलं होतं. मात्र कोरोना विषाणुंच्या संसर्गामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व शिवसैनिकांना आता या काळात शंभर टक्के समाजकारण करण्याचा आदेश दिला आहे. 54 वर्षांच्या शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कशी असेल या संदर्भात आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement