एक्स्प्लोर

शिवसेनेला आमदार फुटण्याची भीती, सर्व आमदारांना अज्ञातस्थळी ठेवणार

शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज 'मातोश्री'वर बैठक बोलावण्यात आला आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेलं जाणार आहे.

मुंबई : सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज (07 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेलं जाणार आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने हा खबरदारीचा उपाय योजला आहे.

उद्या (08 नोव्हेंबर) रात्री 12 वाजता सध्याची विधानसभा विसर्जित होईल. त्याअगोदर बहुमत मिळालेल्या पक्षाने (युतीने किंवा आघाडीने) सत्तास्थापनेचा दावा करुन मंत्रीपदांची शपथ घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आजच सत्तास्थापनेचा दावा करेल, असे भाकित वर्तवण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापन करायची असेल, तर त्यांच्याकडे 145 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. भाजपकडे आत्ता 115 ते 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, याची शिवसेनेला भिती आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.

काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या रणनितीसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानंतरच आजची राज्यपाल भेट ठरवण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Nalasopara Crime News: गरबावरुन टिप्पणी, मोबाईलमध्ये मुलींचे 150 अश्लील व्हिडीओ, परदेशात विकल्याचाही आरोप; नालासोपारामधील भयंकर घटना
गरबावरुन टिप्पणी, मोबाईलमध्ये मुलींचे 150 अश्लील व्हिडीओ, परदेशात विकल्याचाही आरोप; नालासोपारामधील भयंकर घटना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
Raju Shetti: ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
ऊसदर जाहीर न करता ऊस तोडायला ती तुमच्या बापाची पेंड आहे का? राजू शेट्टींचा दिलीप वळसे पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, तेव्हा तुम्ही गोट्या खेळत होता का?
Embed widget