Vaibhav Naik on Nitesh Rane : नितेश राणेंनी सोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवाव, वैभव नाईकांचा निशाणा
शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला आहे. नितेश राणेंनी सोबतच्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवाव असं आव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे.
Vaibhav Naik on Nitesh Rane : भाजपचे नेते किरीट सोमय्यांना शिवसैनिकांना प्रसाद दिला आहे. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला आहे. नितेश राणेंनी शिवसेनेला आव्हान देण्याचे काम केले आहे. नितेश राणेंनी आपल्यासोबत असलेल्या पोलिसांना बाजूला ठेवून घरी जाऊन दाखवाव असं आव्हान वैभव नाईक यांनी त्यांना दिले आहे.
नारायण राणे यांना महाराष्ट्राची सुरक्षा कमी पडली म्हणून त्यांनी केंद्राची सुरक्षा मागवली. अनेक भाजपच्या नेत्यांनी केंद्राची सुरक्षा मागितली आहे. त्यामुळे कोण कोणाला भीत आहे हे जनतेला आणि महाराष्ट्राला माहित असल्याचे वैभव नाईक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संयमी पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे. परंतू शिवसेनेला जर कोणी हिनवत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी नाईक यांनी दिला. यावेळी नाईक यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
काय म्हणाले होते नितेश राणे
आम्हाला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खराब करायची नाही. ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्याच पक्षाचे कार्यकर्ते मस्ती करत आहेत. त्यांचेच नातवाईक असा धिंगाणा घालत असतील तर राज्यातील जनतेने कायदा सुव्यवस्थेबाबत कोणाकडून अपेक्षा ठेवावी असेही म्हणत आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. किरीट सोमय्या हे भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्यांच्यावर हल्ला झाला आहे. हा नामर्दाणपणाचा प्रकार सुरु असल्याचे नितेश राणे म्हणाले. तुम्ही हल्ले करताना आम्ही शांत बसणार नाही असेही राणे म्हणाले. मुख्यमंत्री पोलिसांवर दबाव टाक असल्याचा आरोप राणेंनी केला. तुम्हाला आमच्या जीवापर्यंत यायचे असेल तर आम्हालाही जीवाचे संरक्षण करायचे आहे. ही राजकीय लढाई नाही, कारण राजकीय लढाई ही व्यासपीठावर लढली जाते. हे सध्या अघोषीत गँगवार सुरु असल्याचे राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nitesh Rane : आता तांडव होणार, किती गुन्हे दाखल करायचे ते करा, नितेश राणेंचा इशारा
- माझा मनसुख हिरेन करण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल