एक्स्प्लोर

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी, शिंदे-ठाकरेंच्या वकिलांची खडाजंगी, वैयक्तिक टिप्पणीवर नार्वेकर नाराज

वैयक्तिक टिपण्णीवरुन अध्यक्षांनी दोन्ही वकिलांवर नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिगत टीका नको, मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) सुनावणी सुरुवात झालीय. ठाकरे-शिंदे गटाच्या वकिलांच्या युक्तीवादादरम्यान खडाजंगी पाहायला मिळाली आहे.  वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टीका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीका टिप्पणीवरअध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.  

शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी उपस्थित आहेत. 24  तारखेपर्यंत शिंदे गटाला वेळ देण्यात आलाय. कागदपत्र सादर करण्यासाठी हा वेळ देण्यात आलाय. ठाकरे गटाने आज कागदपत्रं सादर केली. शिंदे गटाने मात्र कागदपत्रं सादर करण्यास वेळ मागितला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंच्या साक्षीचं वाचन केलं. प्रभूंनी दिलेल्या साक्षीनुसार संबंधित कागदपत्रं ठाकरे गटाने सादर केली. ही साक्ष विधीमंडळाकडून टाईप केली जात आहे. त्यात कुठलीही चूक होऊ नये, म्हणून विधीमंडळाकडून सुरु असलेली टायपिंग दिसण्यासाठी एक मोठी स्क्रीन लावण्यात आली आहे 

सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, ठाकरे गटाची मागणी

शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट  हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले जात आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेपाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, अशी मागणी ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केली.  विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळली आहे. सर्व युक्तिवाद व आक्षेप हे रेकॉर्डवर घेतले जात असल्याचा निर्वाळा अध्यक्ष नार्वेकरांनी दिला आहे. शिंदे यांनी पुराव्यांवर घेतलेले आक्षेप इथेच नोंदवले जावेत ते बंद दारामागे होऊ नये आणि अध्यक्षांनी त्यावर काय रुलिंग दिलं ते सुद्धा रेकॉर्डवर घ्यावं,  अशी देखील माहणी कामात यांनी   केली आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
Embed widget