एक्स्प्लोर

Sanjay Raut : उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू, मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल 

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नसल्याचे राऊत म्हणाले.

Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) धिक्कार करणं गरजेचं होतं. मात्र, ते तोंड शिवून गप्प बसल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारकडून शिवप्रताप दिन साजरा करणं हे ढोंग असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. उदयनराजे यांचे अश्रू आम्ही पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हतबल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्व अधिक वाढलं असतं असे राऊत म्हणाले. महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात असल्याचे राऊत म्हणाले. शिवरायांचा अपमान ऐकण्यापेक्षा मरण का आलं नाही? ही उदयनराजेंची भावना महाराष्ट्राची भावना असल्याचे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे हतबल सरकार असल्याचे ते म्हणाले. 

...तरीही सरकार तोंड शिवून बसलंय 

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. कारण छत्रपती शिवरायांचा राज्यपालांनी अपमान करुनही मुख्यमंत्री अद्याप गप्प आहे. ते काहीही बोलायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले. शिवप्रताप दिनाचा उत्सव हा महाराष्ट्रात दरवर्षी होत असतो. शिवप्रताप दिनाचा महत्त्व समजून घ्या, असेही राऊत म्हणाले. शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल अजून राजभवनात आहेत  आणि सरकार तोंड शिवून गप्प बसलं असल्याचे ते म्हणाले. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते हे देखील शिवाजी महाराजांवरती बोलून, त्या पदावर बसलेले आहेत. असं असताना तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात असे म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. अशा मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का ? असा विचार या राज्यातील जनता करत असल्याचे राऊत म्हणाले. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत, आमचे मुख्यमंत्री कुठे?

बेळगावच्या समन्सला आम्ही वकील पाठवले आहेत. त्यानंतर पुढली तारीख असेल, त्या पुढल्या तारखेला मी उपस्थित राहणार असल्याचे राऊतांनी सांगितलं. कर्नाटक सीमा वादावर सुनावणी झाली तर होईल. त्याची आम्ही सगळेच वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत, आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत?  हा मोठा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Udayanraje Bhosale News : प्रतापगडावरील शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित राहणार नाहीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget