(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत ईडी-भाजपविरोधात आक्रमक; पत्रकार परिषदेतील 10 प्रमुख मुद्दे
Sanjay Raut Press Confernce Highlights : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भाजप आणि ईडीवर पत्रकार परिषद घेत तोफ डागली. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
Sanjay Raut Press Confernce Highlights : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित ईडीविरोधात खळबळजनक आरोप केले. त्यानंतर आज संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत ईडी आणि भाजपवर तोफ डागली. येत्या काही दिवसात ईडी अधिकारी आणि भाजपचा खरा चेहरा उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आक्रमकपणे आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारमुळे आज देशात आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
> केंद्रीय यंत्रणा क्रिमिनल सिडिंकेट चालवत आहेत
> ईडीचे अधिकारी मविआ नेत्यांना घोटाळ्यात अडकवण्यासाठी कंत्राटदारांना गन पाईंटवर आमची नावं घेण्यासाठी धमकावत आहेत.
> भाजपचे नेते ईडीच्या कार्यालयात बसून असतात. त्यांची नावं मी लवकरच जाहीर करणार > पुढील पत्रकार परिषद ईडी कार्यालयाबाहेर घेणार
> सरकार पाडण्यासाठी ईडीच्या मार्फत आम्हाला तुरुंगात घालण्याचा डाव आखत आहेत.
> तुमची इच्छा असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ. पण त्याच कोठडीत तुम्हाला घातल्याशिवाय राहणार नाही. तुमचे पापं अधिक आहेत, आम्ही स्वच्छ आहोत. तुम्हाला घाबरत नाही.
> महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी, तुरुंगात डांबण्यासाठी ईडी काम करतंय. अशा एजन्सीच्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही एफआयआर दाखल करणार आहोत.
> अधिकारी वसुलीचं काम करतात. त्यांचे एजंट बाहेर फिरतात.
> आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही. मी काय बोलतोय हे त्यांना (भाजप) नीट कळतंय
> बाहेरून आलेले अधिकारी महाराष्ट्रातील, मुंबईतील निष्पाप नागरिकांना धमकावत आहेत.
> ईडी अधिकाऱ्यांची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही; फडणवीसांचं नाव घेऊन राऊतांचा थेट हल्ला
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप