एक्स्प्लोर
महालक्ष्मी एक्स्प्रेसऐवजी अंबाबाई एक्सप्रेस करा, शिवसेनेची मागणी

कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसचं नाव बदलून ते अंबाबाई एक्स्प्रेस करण्यात यावं, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. काल कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आर्थिक फायद्यासाठी कोल्हापुरातल्या अंबाबाईची महालक्ष्मी केली गेली, असा आरोप अंबाबाईच्या भक्तांचा आहे. अनेक वर्षांपासून याबाबतची मागणी सुरु आहे. यात आता शिवसेनेनंही उडी घेतल्यानं हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. शिवसेनेनं आज महालक्ष्मी एक्सप्रेसचं नाव बदलून अंबाबाई एक्सप्रेस करा अशी मागणी करत, कोल्हापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे, कोल्हापूरच्या अंबाबाईला घागरा नेसवण्याच्या प्रकरणी पुजारी अजित ठाणेकर यांनी माफीनामा सादर केला आहे. पण अंबाबाईचे भक्त मंदिरातून पुजारी हटवण्यावर ठाम आहेत. अजित ठाणेकर यांनी काही दिवसांपूर्वी देवीला घागरा नेसवल्यानं वाद उभा राहिला होता. त्यानंतर शाहू महाराजांच्या एका वटहुकूमाला पुजारी मंडळानं तथाकथित हा शब्द वापरल्यानं वाद आणखीन वाढला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अजित ठाणेकर यांना मारहाणही करण्यात आली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















