एक्स्प्लोर
21 आणि 22 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा, आदित्य ठाकरेही सोबत असणार
या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे कोल्हापूरचे सर्व आमदार, खासदार आणि महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहेत.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर, सागंली जिल्ह्यातील पूर सध्या ओसरताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक, धैर्यशील माने या शिवसेना नेत्यांसह इतर कार्यकर्त्यांनी जमेल तशी मदत पूरग्रस्त भागाला केली आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी आपण लवकरच आदित्य ठाकरे यांच्यासोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहोत, असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे येत्या बुधवारी आणि गुरुवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.
या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे कोल्हापूरचे सर्व आमदार, खासदार आणि महत्वाचे नेते देखील उपस्थित असणार आहेत.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी गाव दत्तक घेणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement