एक्स्प्लोर
उद्धव-मुख्यमंत्र्यांचा फोन कॉल, स्था.स्व. निवडणुकीत युती पक्की?
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि भाजपमध्ये सारं काही आलबेल आणि गोड होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'एकला चलो रे'ची हाक दिल्यानंतरही पालिकेत युतीसाठी दोन्ही पक्षांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची फोनवरुन चर्चा झाली.
भाजप आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या घरी गुरुवार सकाळपासून बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून खा. विनायक राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली. त्यामुळे आता 212 नगरपालिकांसाठी सरसकट नाही, पण जिथं शक्य आहे, तिथं युती करण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
सर्व सन्मानपूर्वक झालं तर युती शक्य होईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. सेनेशी चर्चेस पूर्णपणे तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
युतीचा निर्णय हा जिल्हा स्तरावर घेण्यात यावा, आम्ही शिवसेनेशी पूर्णपणे चर्चा करण्यास तयार आहोत, सर्व गोष्टी सन्मानपूर्वक झाल्या, तर युती शक्य होईल, असं दानवे यांनी पुण्यात स्पष्ट केलं होतं.
'शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांवर टीका-टिपणी करु नये. शिवसेनेने टीका करायला नको. एकमेकांवर टीका करणं अयोग्य आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो', असं मत सुधीर मुनगंटीवारांनी व्यक्त केलं होतं.
'काँग्रेस-राष्ट्रवादीने अशाचप्रकारे एकमेकांवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. सेना-भाजपने आपापसात टीका टाळायला हवी', असं आवाहन मुनगंटीवारांनी केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement