एक्स्प्लोर

सेना-भाजप झेंडावॉरमध्ये गुंग, हुतात्म्यांचा मात्र विसर

हुतात्मा स्मारकावर साधं फूल नाही, त्यापेक्षा काँग्रेस परवडले, राज ठाकरे सरकारवर बरसले      मुंबई : महाराष्ट्र दिनीही शिवसेना-भाजपमधला वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधन आज भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि शिवसेना भवन परिसरातच भाजपनं ठिकाठिकाणी झेंडे लावले.   प्रत्येक राजकीय मुद्दयावर भाजपला घेरणाऱ्या सेनेविरोधात आता भाजपनंही मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. दादरच्या सेना भवन चौकात भाजपचे झेंडे लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. अनेक राजकीय मुद्द्यांवर शिवसेना भाजपला घेरण्याचा प्रयत्न करते, मात्र आज भाजपनं शिवसेना भवनालाच झेंडे आणि पताकांनी वेढा घातला.   हुतात्म्यांचा विसर :   एकीकडे झेंडावॉर सुरु असताना ज्या 105 हुतात्म्यांनी आपले प्राण देऊन मुंबईसकट संयुक्त महाराष्ट्र अबाधित ठेवला, त्यांचाच सेना-भाजपला विसर पडल्याचं दिसतं आहे. आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर साधी साफ-सफाईदेखील केली गेली नाही. महत्त्वाचं म्हणजे असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे.   शिवसेना-भाजपच्या एक-दोन नेत्यांनी स्मारकावर हजेरी लावली खरी मात्र, साधं एक फुलही या स्मारकावर वाहिलं गेलं नाही. त्याऐवजी दोन्ही सत्ताधारी आपापल्या नियोजित कार्यक्रमांद्वारे शक्तीप्रदर्शन आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंग असल्याचं चित्र दिसलं.     आतापर्यंत प्रत्येक महाराष्ट्र दिनाला याठिकाणी मोठी सजावट केली जायची.. शिवाय सत्ताधाऱ्यांसह विरोधक सर्वच जण आवर्जून उपस्थित राहायचे. एकीकडे मंत्रालयासह अनेक प्रशासकीय इमारती सजवल्या जात असताना हुतात्मा स्मारकाबद्दल उदासीनता का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा, थेट अमित शाहंना धाडलं पत्र, राज ठाकरेंचंही केलं कौतुक 
तुकाराम मुंढेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करा, थेट अमित शाहंना धाडलं पत्र, राज ठाकरेंचंही केलं कौतुक 
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या

व्हिडीओ

Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
राज्यातील 'या' बँकेतून पैसे काढण्यास मनाई, सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू, आरबीआयचा मोठा निर्णय 
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू
Ration Card EKYC Online : रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
रेशनकार्डची केवायसी कशी करायची? AtoZ माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2026 | शनिवार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
हे शेवटचं आंदोलन, मागणीत एकही माघार नाही; अंतरवालीतून जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार, म्हणाले मुंबईकडे कूच करणार
Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
पर्यटनासारखं दवाखान्यात येतात, तमाशा जास्त करतात; चित्रा वाघ यांच्या दौऱ्यानंतर यशोमती ठाकूर संतापल्या
Baba Ramdev: एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
Embed widget