(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान
Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत 33 केंद्रांवर मतदान होणार आहे.
Shivaji University Senate Election 2022 : शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत 33 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतमोजणी बुधवारी होईल. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, शिव-शाहू आघाडीअंतर्गत शिवाजी विद्यापीठ (Shivaji University Senate Election 2022) शिक्षक संघ (सुटा), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, युवा सेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मतदानासाठी जिल्हानिहाय मतदान केंद्रे करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात 11 केंद्र आहेत. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. कोल्हापुरात सायबर, कॉमर्स कॉलेज व छत्रपती शाहू महाविद्यालय (सदर बाजार) या ठिकाणी मतदान करता येणार आहे. दरम्यान, मतदानाला सकाळपासून उत्साह दिसून आला. सायबर काॅलेज मतदान केंद्रावर हसन मुश्रीफ यांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार ऋतुराज पाटील यांनीही या मतदान केंद्राला सदिच्छा भेट दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील तिन्ही मतदान केंद्रावर उत्साह दिसून आला.
शिव-शाहू आघाडीनेही जोरदार तयारी करत निवडणूक लढवली आहे. मतदानासाठी आवश्यक साधनसामग्री घेऊन अधिकारी मतदान केंद्रांवर काल रवाना झाले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 वाहने ठिकठिकाणी रवाना झाली. (Shivaji University Senate Election 2022)
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटसह अन्य अधिकार मंडळाच्या निवडणुकीत शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी व शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या काही सदस्यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. प्राचार्य गट व संस्थाचालक गटात विद्यापीठ विकास आघाडीने वरचष्मा कायम ठेवला आहे. या दोन्ही गटातील सोळापैकी 13 जागा बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान विद्यापीठ विकास आघाडीने विविध अभ्यास मंडळाच्या मिळून 34 उमेदवार व अॅकेडमिक कौन्सिलचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याचे म्हटले आहे.
संस्था चालक गटात 5 विद्या परिषदेत 2 प्राचार्यांमध्ये 8 आणि 28 पैकी 18 अभ्यास मंडळातील 39 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हानिहाय मतदार संख्या
- कोल्हापूर : 25488
- सांगली : 7641
- सातारा : 3214
- एकूण : 36343
इतर महत्वाच्या बातम्या