एक्स्प्लोर

मुंबईतल्या 36 पैकी 25 जागांवर ठाकरेंची नजर; निवडलेल्या जागांवर सध्या कुणाचे आमदार?

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तायरी असल्याची माहिती मिळत आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभा, विधान परिषदेची रणधुमाळी संपली, आता आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election 2024) चाहुल लागली आहे. अशातच अद्याप विधानसभेचं बिगुल वाजलं नसलं तरीदेखील, सर्व पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभेप्रमाणेच (Lok Sabha Election 2024) यंदाच्या विधानसभेतही महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi), अशीच चुरस पाहायला मिळणार आहे. सर्व पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच सध्या ठाकरेंनी (Uddhav Thackrey) देखील विधानसभेचं मैदान मारण्यासाठी जागांची चाचपणी सुरू केली आहे.

ठाकरेंचा बालेकिल्ला असलेली मुंबई (Mumbai Election 2024) जिंकण्यासाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे. मुंबईतील एकूण 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 जागांवर लढण्याची ठाकरे गटाची तायरी असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीतच, मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याचं समजतयं. 

ठाकरेंची नजर असलेल्या 25 जागांवर सध्या आमदार कोण? 

विधानसभा मतदारसंघ आमदाराचं नाव पक्ष
माहिम  सदा सरवणकर  शिवसेना
वरळी  आदित्य ठाकरे शिवसेना(उबाठा)
शिवडी  अजय चौधरी शिवसेना(उबाठा)
भायखळा यामिनी जाधव शिवसेना 
मलबार हिल  मंगलप्रभात लोढा  भाजप 
चेंबूर प्रकाश फातर्पेकर शिवसेना (उबाठा)
विकोळी  सुनील राऊत शिवसेना (उबाठा)
भांडूप (पूर्व) रमेश कोरगावकर शिवसेना (उबाठा)
मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना
जोगेश्वरी सध्या रिक्त ( रवींद्र वायकर) शिवसेना
 कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना 
कलिना संजय पोतनीस शिवसेना (उबाठा)
अंधेरी (पूर्व) ऋतुजा लटके शिवसेना (उबाठा)
दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना (उबाठा)
दहिसर मनिषा चौधरी भाजप
 गोरेगाव  विद्या ठाकूर भाजप
वर्सोवा भारती लवेकर भाजप
विलेपार्ले पराग आळवणी भाजप
वांद्रे (पूर्व) झिशान सिद्दीकी काँग्रेस
वडाळा  कालिदास कोळंबकर भाजप 
कुलाबा राहुल नार्वेकर भाजप
चांदिवली  दिलीप लांडे शिवसेना
मानखूर्द-शिवाजीनगर  अबु आझमी समाजवादी पार्टी
अणुशक्ती नगर   नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस
बोरिवली   सुनील राणे भाजप
मलबार हिल  मंगलप्रभात लोढा  भाजप

ठाकरे गटाला हव्या असलेल्या 25 जागा कुणाकडे ? 

पक्ष विधानसभा जागांची आकडेवारी
शिवसेना (ठाकरे गट) 8
शिवसेना (शिंदे गट) 6
भाजप 8
काँग्रेस 1
राष्ट्रवादी काँग्रेस  1
सपा 1

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे, तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचं नियोजन करत असल्याची माहिती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ : Uddhav Thackeray Shivsena : ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी 25 जागा लढण्याच्या तयारीत

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मोठी बातमी: शिवडी, भायखळा ते विक्रोळी, कलिना ते कुलाबा, मुंबईतील 25 जागांवर ठाकरेंची तयारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget