एक्स्प्लोर

'शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?', 'सामना'तून भाजपवर जहरी टीका

सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Shivsena article) भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. यात भाजपसह राज्यपालांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे.

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात ईडीचा गैरवापर झाला नाही काय? व्वा! काय म्हणायचे या अक्कलशून्य मंडळींना! काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच ते म्हणतात. मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला? असा सवाल अग्रलेखातून शिवसेनेनं केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटनाच बदलून तुम्ही ईडी कार्यालयात बसून नवी घटना लिहून काढलीत? हवाबाण थेरपीचा अतिरेक झाला की, मेंदूत सडकी हवा जाते. त्या पादऱ्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजप! भाजपच्या 'नव्या घटना समिती'चा विजय असो! डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण! हेच तुमचे भविष्य!, असं म्हणत जहरी टीका भाजपवर केली आहे.

भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सध्या महाराष्ट्रात 'ईडी' प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपची इडा-पीडा गेल्यापासून हे 'ईडी' प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपविरोधकांना नमविण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. याच वातावरणाचा लाभ घेत ईडीस घाबरून भाजपच्या कळपात शिरलेल्या एका 'महात्म्या'ने 'ठाकरे सरकार' पडण्याचा नवा मुहूर्त दिला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार! हा मुहूर्त यांनी 'ईडी पिडी'च्या पंचांगातून काढला की त्यांना झोपेत दृष्टांत झाला? एक मात्र खरे, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्ता स्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत अग्रलेखात म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस म्हणतात तेदेखील बरोबरच आहे, कर नाही त्यास डर कशाला? हे त्यांचे सांगणे अगदी बरोबर आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांनाच का येत आहेत, हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपावालेच रोज गंगास्नान करतात व उर्वरित लोक गटारस्नान करतात असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर कर नाही तर डर नाही वगैरे ठीकच, पण करून सवरून नामानिराळे राहणाऱ्यांची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाबरीचा विध्वंस! तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल, असं म्हणत शिवसेनेनं फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून

शिवसेनेनं म्हटलं आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता घटनेचा प्रश्न उपस्थित करीत सांगितले की, 'ईडी वगैरे संस्था या बिगर राजकीय असून त्या घटनेशी बांधील आहेत. त्यामुळे संजय राऊत वगैरे लोकांना घटना मान्य नाही का?' पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा व त्यावर आपले राज्यपाल महोदय काय सांगतात ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवायला हवे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

राज्यपालांच्या मनातले सरकार येण्याची लक्षणे दिसत नाहीत घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या? राज्यपालांनी या जागा लगेच भरायलाच हव्यात असे घटना सांगते. 2020 चे ठाकरे सरकार पडण्याचे सर्व मुहूर्त, प्रयोग फसले आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या मनातले सरकार येत्या पाच-पंचवीस वर्षांत तरी महाराष्ट्रात येण्याची लक्षणे दिसत नाहीत. मग वाट कसली पाहताय? 'ईडी'च्या बाबतीत ज्यांना 'घटना' आठवते त्यांनी राज्यपाल नियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे. सध्या एक संवाद सर्वत्र गाजतो आहे तो म्हणजे, 'त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता?' त्यातलाच हा प्रकार! 'ईडी' वगैरेचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 February 2025Prajakta Mali News : प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, प्राजक्ताचे सहकारी कार्यक्रम सादर करणारABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 26 February 2025  दुपारी 3 च्या हेडलाईन्सAmol Mitkari EXCLUSIVE : Sanjay Rathod,Tanaji Sawant,Sandipan Bhumre;मिटकरींच्या टार्गेटवर Shiv Sena

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
US Citizenship Rule : 43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
43 कोटी द्या आणि अमेरिकेचे नागरिकत्व घ्या, ट्रम्प यांनी नवी योजना
Pune Crime: पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
पुण्यातील स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा फोटो समोर, पोलिसांची 8 पथकं सक्रिय
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
फिक्सरवर सिक्सर... तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वरुन गंभीर आरोप
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Embed widget