Shivsampark Abhiyan : निवडणुकांसाठी शिवसेनेनं कंबर कसलीय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, येत्या 22 मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील शिवसेनेच्या 19 खासदारांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. एका खासदारांच्या मदतीला 12 पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.


पहिला टप्पा 22 ते 25 मार्च


राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहीती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान सुरु केलं आहे. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्चदरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरु होणार आहे.


शिवसंपर्क अभियानाचे कसं असेल नियोजन
 
पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरु करण्यात येणार आहे.  या 19 जिल्ह्यात शिवसेनेचे 19 खासदार शिवसंपर्क अभियान सुरु करणार आहेत. पहिल्या टप्यातील 19 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची 12 जणांची टीम कार्यरत असणार आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहोचवणार आहे. शिवसेनेच्या या शिवसंपर्क अभियानात सहभागी असणाऱ्या सर्व खासदारांना आणि पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता व्हिडिओ काँन्फरसिंगद्वारे संबोधीत करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत तसेच मुंबईतील इतर खासदार शिवसेना भवनात उपस्थित रहाणार आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: