Devendra Fadnavis Speech : 'मविआ-एआयएम (Maha Vikas Aghadi aimim)एकत्र आले तरी फरक पडणार नाही, भाजपला हरवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत पण जनता भाजपच्या पाठिशी आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलताना म्हणाले की,  ते सर्व एकत्रित आले तर, शेवटी ते सर्व एकच आहेत. भाजपला अडवण्यासाठी, पराभूत करण्यासाठी सर्व एकत्रित देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्व एकत्रित आले तरी महाराष्ट्रातली जनता मोदींवर विश्वास ठेवणारी आहे. जनता भाजपलाच निवडून देईल, असं ते म्हणाले. 


मात्र या सर्व प्रकारात शिवसेना काय करणार हे आम्हाला पाहायचे आहे. हे हरले तर यांना ईव्हीएम दिसते, बी टीम, सी टीम, झेड टीम दिसून येते. हरल्यानंतर या पद्धतीच्या टीका करत असतात. आता शिवसेना सत्तेसाठी काय करते, हे आम्हाला पाहायचे आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं आधीच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वीकारलेला आहे. अजानची स्पर्धा ते घेऊ लागले आहेत. aimim सोबत युती हे त्याचा परिणाम आहे का पाहू, असं ते म्हणाले.


नवाब मलिक यांच्यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्ती हा जेलमध्ये असताना पदावर राहणे योग्य नाही. नवाब मलिक हे संविधानिक पदावर आहेत, ते स्टेट्युटरी पदावर नाहीत, असं ते म्हणाले. 


राजू  शेट्टी यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राजू शेट्टी यांच्याशी अजून माझी यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. मुळातच राजू शेट्टी आमच्यासोबत होते, काही कारणाने ते पलीकडे गेले. कोण आमच्यासोबत येणार कोण नाही, हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मात्र जो कोणी शेतकरी नेता असेल त्याने जर मागच्या काळात वळून पाहिलं तर जेवढे निर्णय शेतकरी हिताचे पंतप्रधान मोदींनी घेतले, तेवढे कोणी घेतले नाही. तसेच साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारन जेवढं केलं, तेवढं कोणीच केलेलं नाही.त्यामुळे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मात्र अद्यापही माझी राजू शेट्टी सोबत कुठली चर्चा झालेली नाही, असं फडणवीस म्हणाले.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 





संबंधित बातम्या


महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवा : इम्तियाज जलील 


Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याकडून Congress आणि राष्ट्रवादीला आघाडीसाठी ऑफर : ABP Majha