Sanjay Raut on MIM : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार राहणार. औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे, त्यांच्यासोबत युती होणार नाही, असे सांगत  शिवसेना नेते संजय राऊत एमआयएमसोबतच्या युतीची शक्यता फेटाळली लावून आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारांचे आहेत. औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, ज्यांचा आदर्श औरंगजेब आहे. त्यांच्यासोबत युती शक्य नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. एमआयएमसोबत उघड अथवा छुपी युती होणार नाही. ज्यांच्यासोबत त्यांची छुपी युती आहे, ती युती त्यांना लखलाभ ठरो असेही राऊत यांनी म्हटले. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून त्यात चौथा पक्ष येणार नाही असेही त्यांनी म्हटले. 


एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचे राऊत यांनी सांगितले. एमआयएमची भाजपसोबत छुपी युती आहे. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हे दिसून आलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


इम्तियाज जलील काय म्हणाले?


ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.  महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.  राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.  शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.


पाहा: औरंगजेब त्यांचा आदर्श ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाही : राऊत



इतर महत्त्वाच्या बातम्या: