तुरुंगातही संजय राऊतांची लेखणी सुरूच; स्वतःवरील आपबीती पुस्तक रुपात मांडणार, कुणाचा भांडाफोड होणार?
Shiv Sena MP Sanjay Raut : तुरुंगातही संजय राऊतांची लेखणी सुरूच आहे. स्वतःवरील आपबीती पुस्तक रुपात मांडणार, पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
Shiv Sena MP Sanjay Raut : अटक होण्यापूर्वी संजय राऊत (Sanjay Raut) दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीकेची तोफ डागायचे. यावरुन अनेक विरोधकांनी त्यांच्यावर खोचक टीकाही केली होती. पण अटकेनंतर दररोज सकाळी विरोधकांना पळता भुई थोडी करणारे संजय राऊत कारागृहात काय करत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर याचं उत्तर आता मिळालं आहे. संजय राऊत सध्या कारागृहात एक पुस्तक लिहित आहेत. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील गुन्ह्यांवर आधारित हे पुस्तक असेल अशी माहिती मिळत आहे.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत तुरंगात असले तरी त्यांची लेखणी अजूनही सक्रीय आहे. संजय राऊत तुरुंगात पुस्तक लिहित आहेत. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणावर ते पुस्तक लिहित असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे संजय राऊत आपल्या पुस्तकातून कोणता भांडाफोड करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली
सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं : संजय राऊत
आज संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली होती. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी वेळेअगोदर पोहोचल्यामुळे संजय राऊत यांनी काही काळ माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, "सगळी केस खोटी आहे, माझा काही संबंध नाही. प्रवीण राऊत माझे नातेवाईक, फक्त दोन जणांना ओळखतो", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. मी स्वस्थ आहे काहीच त्रास नाही, असं सांगत संजय राऊतांनी आपली खुशालीही सांगितली. त्यासोबतच सच के साथ लढ सकते हैं, झूट के साथ नहीं, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या कथित पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपांखाली अटकेत आहेत. आज झालेल्या सुनावणीनंतर त्यांची रवानगी पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत झाली आहे. संजय राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजय राऊतांची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी
गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना आजही दिलासा मिळू शकला नाही. राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत यांना आता आर्थर रोड तुरुंगात 5 सप्टेंबरपर्यंत राहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Sanjay Raut Custody : संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला; 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी