एक्स्प्लोर

उबाठा चे नाव बदलून आता काँग्रेस उबाठा केलं पाहिजे; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची बोचरी टीका 

Maharashtra Politics : उबाठा चे नाव बदलून आता काँग्रेस उबाठा असं केले पाहिजे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलीय.

Maharashtra Politics : शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीमध्ये कोणाचे पाय धरायला गेले होते? असा सवाल करत उबाठा चे नाव बदलून आता काँग्रेस उबाठा असं केले पाहिजे, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलीय. दरम्यान, बांगलादेशमध्ये  हिंदूवरती रोज अत्याचार होत असताना उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द काढला नाही. आज बाळासाहेब असते तर काय बोलले असते, असा सवाल करत प्रताप जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती नाव न घेता टीकास्त्र सोडलंय. जालना येथे प्रतापराव जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे शंभर टक्के सेक्युलर झालेले आहेत 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Election) पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीनदिवसीय दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी करतानाच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मात्र महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर हल्लाबोल सुरूच आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या वर निशाणा साधत टीका केलीय. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एकही गुणधर्म उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही. ते आता शंभर टक्के सेक्युलर झालेले आहेत. दररोज बांगलादेशात हिंदूची कत्तल आणि अत्याचार होत असताना त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. मी बाळासाहेबांचा वारसदार म्हणून लोकांची सहानुभूती घ्यायची. मात्र त्यांच्या विचारांची अवहेलनाच केली जात असल्याची टीका ही प्रतापराव जाधव यांनी केलीय.

मर्यादा ओलांडल्या की त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांना, पंतप्रधान यांना विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी दिल्लीला जातात. मात्र आता लोक प्रश्न विचारत आहेत की  उद्धव ठाकरे दोन दिवस दिल्लीला कशाला गेलेत. तर दोन दिवस त्यांनी काँग्रेस नेत्यांसमोर लोटांगण घातले आहे. लांगुंनचालन केलंय. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मला मिळावी, म्हणून त्यांनी प्रयत्न केलाय. बाळासाहेब कधीही सत्तेसाठी हापापलेले नव्हते. त्यामुळे एक प्रकारे हा बाळासाहेबांचा आणि शिव सैनिकांचा अपमान आहे. यापूर्वी आम्ही बाळासाहेब यांचे सुपुत्र म्हणून आदर करत होतो. पण त्यांनीच आता सुरुवात केलीय.

आमच्या नेत्यांवर जर आरोप करतील तर त्याच भाषेत शिव सैनिक आरोप करत त्यांना उत्तर देतील. आरे ला कारे ने उत्तर द्यावं,  ही आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आपल्याला जर एका गालात कुणी मारली तर आपण त्यांच्या दुसऱ्या गलात मारली पाहिजे. हे देखील बाळासाहेब आम्हाला सांगायचे. आम्ही बाळासाहेब यांची विचारांचे सैनिक आहेत. संयम पळण्यासही मर्यादा असतात, त्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या आहेत. त्यामुळे त्याच भाषेत त्यांना प्रत्युत्तर मिळेल,  असेही प्रतापराव जाधव म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddiqui Case Update :बाबा सिद्दिकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं, झिशान सिद्दिकींचा जबाबABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines At 8AM 28 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 28 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाTop 70 at 07AM Superfast 28 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदीत महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Embed widget