एक्स्प्लोर

Sanjay Raut : सरकार बदलणार, सर्वांचा हिशोब पूर्ण होणार; संजय राऊतांचा इशार

2024 पुन्हा सरकार बदलणार असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलं आहे. सरकार बदलल्यावर सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल असा इशाराही राऊतांनी दिली आहे.

Sanjay Raut :  कोणतही सरकार कायम असत नाही. 2024 सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल अशा इशारा शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिला आहे. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट (INS Vikrant Scam Case) मिळाली आहे. यावर बोलताना राऊतांनी इशारा दिली. तसेच याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचे राऊत म्हणाले. ते आज सकाळी नाशिकमध्ये (Nashik) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पैसे राजभवनात गेले नाहीत हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा 

सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट असल्याचे राऊत म्हणाले. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झालाच असल्याचे राऊत म्हणाले. पैसे राजभवनमध्ये गेले म्हणतात. राजभवन सांगते पैसे आलेच नाही. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा असल्याचे राऊत म्हणाले. क्लिनचिट कशी मिळते हे राज्याच्या गृहमंत्र्यांना विचारले पाहिजे. आमच्या लोकांना मात्र,  क्लिनचिट मिळत नसल्याचे राऊत म्हणाले. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय असल्याचे राऊत म्हणाले.

मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल 

लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नसल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे. हुकूमशाही नाही असेही राऊत म्हणाले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. सरकार त्याचं समर्थन करते. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. 

राज्यपालांना पदावरुन हटवायला हवं होतं

भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा अपमान होत आहे. तसेच कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यावरुन महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नसल्याचे राऊत म्हणाले. जर आम्ही मोर्चा काढावा असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही राज्यपालांना हटवायला पाहिजे होते. तुम्हा भाजपच्या प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. कारवाई केली नाही मग आम्ही आता मोर्चा काढणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.

सीमाभागाचा प्रश्न महत्वाचा

जरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शाह यांनी भेटले असले तरीसुद्धा सीमाभागत तणाव आहे. आम्ही टोकाची भूमिका घेणार नाही. आण्ही काय होते ते बघू. पण सीमाभागाचा प्रश्नही महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

किरीट सोमय्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचीट; INS Vikrantच्या नावाखाली अपहार केल्याचा होता आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget