एक्स्प्लोर

Shiv Jayanti 2024 : प्रभो शिवाजी राजा! गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह, शिवनेरीवर शिवप्रेमींची गर्दी

Shivjayanti 2024 Celebration : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. या दिवशी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन केलं जातं.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती (Shiv Jayanti) मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं  आयोजन करण्यात आलं आहे.

राज्यासह देशात शिवजयंतीचा उत्साह

किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी नटलेली आहे. गडाच्या पायथ्याला शिवभक्त जमू लागलेत. काही शिवभक्त शिवज्योत घेऊन आपापल्या गावी मार्गस्थ होत आहेत. सोलापुरात शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री 12 वाजता पाळणा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला.  

शिवनेरीवर मोठा पोलीस बंदोबस्त

19 तारखेला शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. 1100 पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त तैनात असणार आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शासकीय कार्यक्रम लवकर संपवणार आहे. त्यामुळे 10 वाजल्यानंतर  शिवभक्तांनी गड चढायला सुरुवात करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेचं ठिकाण बदललं

शिवनेरी गडावरील शिवजंतीचा पाळणा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा होत असते. यावेळेस या सभेचे ठिकाण बदलण्यात आलं आहे. दरवर्षी या सभेचं ठिकाण गडाच्या सुरुवातीलाच असायचे, यावेळी ही सभा गडावरच पण शिवजन्माच्या ठिकाणाच्या पलिकडे होणार आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाने परवानगी दिली आहे. 

आग्रा किल्ल्यात पुन्हा एकदा गुंजणार छत्रपतींची शौर्यगाथा

आग्रा किल्ल्याच्या दिवान-ए-आममध्ये छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा पुन्हा एकदा गुंजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलय. महाराष्ट्र शासन यामध्ये सहआयोजक आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अन्य मान्यवर

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shiv Jayanti 2024 : आज शिवाजी महाराजांची 394 वी जयंती! वेळ, महत्त्व आणि राजांचा इतिहास जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Akole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?Zero Hour Water Crisis : 1500 लोकसंख्येच्या गावात एकच हँडपंप, पाणी टंचाईचा प्रश्न कसा सुटेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget