एक्स्प्लोर
निळवंडे धरणासाठी साई संस्थानाकडून राज्य सरकारला 500 कोटींचं कर्ज
गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळणार आहे.
शिर्डी : शिर्डी साई संस्थानाकडून निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी 500 कोटी रुपये देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने 500 कोटी रुपये देण्यास परवानगी दिल्याने आता साई संस्थान आणि गोदावरी महामंडळ यांच्यात सांमजस्य करार होणार आहे. हे 500 कोटी बिनव्याजी देण्यात येणार असून 125 कोटींचे चार हप्ते दोन वर्षात साई संस्थान सरकारला देणार आहे.
राज्य सरकार या 500 कोटीची दहा वर्षात परतफेड करणार आहे. त्याला कुठलेही व्याज दिले जाणार नाही. मात्र हे पैसे आता दिले जात असल्याने गेल्या चाळीस वर्षापासून रखडलेल्या निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण बांधून पुर्ण आहे. मात्र कालव्यांची कामे निधी अभावी अपूर्ण आहेत. आठ टिएमसीचे हे धरण बांधून पुर्ण झाले, मात्र कालव्याची कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत. आता हे पैसे मिळणार असल्याने रखडलेल्या कालव्यांच्या कामाला गती मिळेल.
संगमनेर, राहाता, राहुरी तालुक्यातील जवळपास 182 गावांना या धरणातून पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे हे पैसे आता दिले जात असल्याने कालव्याची कामे सुरू होणार आहेत. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement