शिर्डी साई मंदिरात हार, फुलं, प्रसादावरील बंदी उठणार? आज महत्वाची बैठक, वादावर तोडगा अपेक्षित
Shirdi Sai Mandir Issue :शिर्डीतील साई मंदिरात (Sai Mandir Shirdi) हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार का याकडं साई भक्तांचं लक्ष लागलं आहे.
Shirdi Sai Mandir Issue :शिर्डीतील साई मंदिरात (Sai Mandir Shirdi) हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार का याकडं साई भक्तांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज साई संस्थान, स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही (Radhakrishna Vikhe Patil) उपस्थित राहणार आहेत.
मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावरुन जोरदार गोंधळ
काल झालेल्या बैठकीत फुलं, प्रसादावरील बंदी उठवण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. बंदीचा हा निर्णय त्रिसदस्यीय समितीचा होता. तसंच शिर्डीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी बंदी कायम ठेवण्याची मागणी केली होती असं या बैठकीनंतर सांगण्यात आलं. या संदर्भात राज्य सरकारची काय नियमावली येते त्यानुसार पुढील निर्णय घेऊ असं संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी सांगितलं आहे. दरम्यान मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावरुन जोरदार गोंधळ झाला होता. काल स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांकडून शिर्डीतील साईबाबा मंदिरात हारं-फुलं नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संस्थानाचे सुरक्षा रक्षक आणि फुलं विक्रेत्यांमध्ये झटापट झाली होती.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत बैठक
शिर्डीत फुले व्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत आंदोलनाबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. शिर्डीत आज फुले व्यावसायिकांच्या बंदीबाबत संस्थान आणि नागरिक, व्यावसायिकांची बैठक होणार आहे. या बैठकीत आज काही तोडगा निघणार का याकडे आता लक्ष लागून आहे.
काल विश्वस्त बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. शिर्डीतील विविध पक्षांच्या नेत्यांनी ही बंदी कायम ठेवण्याची मागणी केली होती. भाविकांची फसवणूक आणि आर्थिक लूट होत असल्याने बंदी कायम ठेवण्याची काही ग्रामस्थांची देखील मागणी होती. फुल विक्रेते, एजंट अव्वाच्या सव्वा दर घेत असल्याच्या भाविकांच्या देखील तक्रारी होत्या.
फुलांवरील बंदीमुळं शेतकऱ्यांचंही नुकसान
कोरोना आल्यापासून जी फुलांवर बंदी आली, ती उठलीच नाही. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलं आहे. शेतातच फुले सडू लागली आहेत आणि इकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. शिर्डी परिसरात जवळपास 500 शेतकरी फुल शेती करतात. शिर्डीत रोज सुमारे 15 लाख रुपयांची उलाढाल होते. जवळपास 300 फुल विक्रेते आहेत. आणि या व्यवसायावर 2 हजारांपेक्षाही जास्त लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. ऑक्टोबर 2021 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत दहा महिने फुल हारावर बंदी घालण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Shirdi : शिर्डीत फुल-प्रसादावरील बंदीवरुन तणाव वाढला; सुरक्षारक्षक अन् आंदोलकांमध्ये झटापट