एक्स्प्लोर

अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत, आम्ही महाविकासआघाडीसोबतच - शरद पवार

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत, असे ट्वीट अजित पवार यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान अजित पवारांच्या ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.

मुंबई : मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्वीट अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांच्या या ट्वीटमुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या ट्वीटला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीशी बंडखोरी करुन भाजपशी घरोबा केलेले अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर अॅक्टीव झालेले पाहायला मिळाले. अजित पवार यांनी ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्व भाजप नेत्यांचे आभार मानले आहे. यात त्यांनी एक धक्कादायक ट्विट केल आहे. त्यामध्ये मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असे लिहिले आहे. त्यासोबच भाजप आणि राष्ट्रवादी मिळून राज्याला 5 वर्षांसाठी स्थिर सरकार देईन. लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या हितासाठी आम्ही काम करू, असेही अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. या ट्वीटनंतर अनेकांच्या मनात गोंधळ सुरु झाला. अजित पवारांच्या बंडामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात तर नाही ना? अशीही शंका काहींनी व्यक्त केली. दरम्यान, अजित पवारांच्या ट्वीटला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. काय म्हणाले शरद पवार? "भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच नाही. शिवसेना, काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं एकमतानं घेतला आहे. अजित पवारांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे." असं शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अजित पवारांचे ट्वीट -  अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश - उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच राज्यात लोकांच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, असंही अजित पवार म्हणाले आहेत. मोदी यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेही आभार मानले आहेत. यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत. संबंधित बातम्या - 30 तासानंतर अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह, तासाभरात केले 21 ट्वीट काळजी करु नका, सरकार आपलंच येईल; पवारांसह उद्धव ठाकरेंचा आमदारांना विश्वास हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना AJit Pawar | मी राष्ट्रवादीतच आणि शरद पवारच आपले नेते - अजित पवार | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget