Sharad Pawar: तीन राज्यात भाजप जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित : शरद पवार
बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणर आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे, असे शरद पवार या वेळी म्हणाले.
![Sharad Pawar: तीन राज्यात भाजप जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित : शरद पवार Sharad Pawar on Election Result Bjp Will Not Wins in Maharashtra Lok Sabha Election 2024 Says Sharad Pawar Sharad Pawar: तीन राज्यात भाजप जिंकले तरी 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव निश्चित : शरद पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/16/0fbd023022c4699169a1047a868a76ec1692188465943265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : मध्यप्रदेश (MP Election), राजस्थान (Rajasthan Election) , छत्तीसगड (Chhattisgarh Election) या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. मात्र आजच्या निकलाचा परिणाम 2024 मध्ये होणार नाही. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. ते साताऱ्यात बोलत होते. सध्या तरी मोदींना (PM Modi) अनुकुल असा ट्रेण्ड आहे, तो मान्य केला पाहिजे, असे देखील शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
शरद पवार म्हणाले, आजच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. भाजपला अनुकूल ट्रेन्ड सध्या दिसतोय हे मान्य केला पाहिजे. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. राज्यातील जाणकारांकडून माहिती घ्यायची आहे. खरी माहिती येत नाही तोपर्यंत ईव्हीएमला दोष देता येणार नाही. मंगळवारी 6 वाजता इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे.
तेलंगणामध्ये राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम
शरद पवार म्हणाले, बीआरएसने स्वत:च्या राज्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांना पराभावाला सामोरे जावे लागणर आहे. राहुल गांधीच्या सभेचा चांगला परिणाम झाला आहे. राहुल गांधीच्या निकालानंतर विजयाची खात्री होती. राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. नवीन लोकांना संधी द्यावी असा ट्रेन्ड दिसत आहे. राहुल गांधींची हैदराबादला सभा झाली तिथे आता संध्याकाळी 5 नंतर चित्र स्पष्ट होईल. मी निवडणूक प्रचारात सहभागी नव्हतो. दिल्लीत बैठक होणार आहे त्यानंतर या विषयी बोलणार आहे .
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
शरद पवार म्हणाले, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत आरक्षण देत असताना दुसऱ्याच्या ताटातील देता कामा नये सर्वांची भुमिका होती. आरक्षणासाठी जनगणना होणे आवश्यक आहे.कुणाच्या ताटातून न देता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. इतरांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी संसदेत जाऊन काही गोष्टी करायला हव्या आहेत. अधिवेशनात या संदर्भात काय होतं याकडे लक्ष आहे.
मराठा आरक्षणामुळे अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष
मराठा आरक्षणामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, नुकसान, दुष्काळ याकडे दुर्लक्ष होतात हे खरे आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारने लक्ष घातले पाहिजेत, असे देखील शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा :
Sanjay Raut: पाचही राज्यांमध्ये भाजपचा दावा म्हणजे मोठा विनोद, संजय राऊतांची टीका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)