एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला काय अधिकार? शरद पवारांचा सवाल

पु.ल.देशपांडे यांनी काँग्रेस विरोधात सभा घेतल्या होत्या. तेव्हा त्यांना कुणी खर्च मागितला नाही. जर त्यांचा उमेदवार निवडणुकीत उभा नाही तर आयोगाला त्यांना खर्च मागण्याचा काय अधिकार आहे, असे ते म्हणाले.

मुंबई : राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला काय अधिकार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राज्यात मोदी आणि शाह यांच्याविरोधात राज ठाकरेंनी 10 सभा घेतल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने राज यांना सभांचा खर्च सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, 1977 मधील पु. ल. देशपांडे यांच्या सभांचा दाखला देत पवारांनी निवडणूक आयोगाला राज यांच्या सभांचा खर्च मागण्याचा काय अधिकार? असा सवाल केला आहे. मुंबईत बोलताना शरद पवार म्हणाले की, 1977 पु.ल.देशपांडे यांनी काँग्रेस विरोधात सभा घेतल्या होत्या. तेव्हा त्यांना कुणी  खर्च मागितला नाही.  जर त्यांचा उमेदवार निवडणुकीत उभा नाही तर आयोगाला त्यांना खर्च मागण्याचा काय अधिकार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, राज्यात परिस्थिती गंभीर आहे.  राज्य सरकारने पिण्याचे  पाणी, पशुधनासाठी छावण्या, रोजगार दिला पाहिजे, असं ते म्हणाले.   या दुष्काळात फळबाग जास्त नुकसान झालं आहे, असेही त्यांनी सांगितलं. या दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पक्षाचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. दुष्काळी परिस्थिती बाबत आम्ही आमचा आढावा त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असेही ते म्हणाले. दुष्काळात राष्ट्रवादीचे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, तालुका अध्यक्ष, विद्यार्थी संघटना काम करतील, असेही ते म्हणाले. सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलेला नाही. पंतप्रधानांच्या वक्तव्यात देशाचा विचार व्हायला हवा, शरद पवारांवर टीका करावी पण दुष्काळाबाबत जाण असलेलं जाणवलं नाही, असेही ते म्हणाले. दुष्काळ असताना आम्ही इलेक्शन कमिशनला सांगायचो. तीन ते चार तासात आम्हाला मंजुरी मिळायची. आता मी गेलो नसतो तर मंत्र्यांनी दौरे केले नसते, असेही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यावर भाष्य केलं. गडचिरोलीत हल्ला झाला ते चिंताजनक आहे. एका दृष्टीने हत्या करण्यात आली आहे.  नक्षल प्रश्न जुना आहे, आम्ही त्यांच्याकडे लॉ अँड ऑर्डर म्हणून बघितलं नव्हतं. आम्ही गडचिरोली विकासासाठी वेगळं पॅकेज दिल होतं. गडचिरोलीत विकासाचा कार्यक्रम आम्ही घेतला होता, त्याकडे आता दुर्लक्ष झालेलं दिसत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.  राज्याचे गृहमंत्री स्वतः सांगलीचे असले तरी ते सातत्याने गडचिरोलीत संपर्क ठेवून दर महिन्याला एकदा जायचे. मात्र सध्याचे मुख्यमंत्री हत्या झाल्यावर पुष्पचक्र व्हायला येतात ही भावना तिथे निर्माण होत आहे, असेही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Gadchiroli Snake Bite Student Death: आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; गडचिरोतील धक्कादायक घटना, मध्यरात्री झोपल्यानंतर काय घडलं?
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
Embed widget