(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीमागे राजकारण नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
अनेक खेळाडूंना वैद्यकिय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितल्याचे शरद पवार या वेळी म्हणाले.
Sharad Pawar : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्तीमागे कोणतेही राजकारण नाही. देशातील, राज्यातील अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे मी कायम अशा संघटनांच्या कामांचे दोन भाग करतो. एक भाग खेळ, खेळाडूंबाबत आणि दुसरा भाग क्रीडा संस्थेच्या प्रशासनाबाबत. परंतु मी त्यांच्या अंतर्गत गोष्टीत कोणत्याही प्रकाराचा हस्तक्षेप केला नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
शरद पवार म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा मी अध्यक्ष आहे. राष्ट्रीय, राज्य स्पर्धांचे आयोजन करणे हे माझे काम आहे. मी त्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेवर गेलो होते. क्रीडा संघटनांना मैदान मिळणे कठीण असते. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे आहे. मी कधीही अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही.
राहुल आवारे, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, किरण भगत यांना मी मदत केली. अनेक खेळाडूंना वैद्यकिय किंवा आर्थिक मदत मी केली आहे. आयुष्यात मी पहिल्यांदा खेळाडूंना जाहीर केलेल्या मदतीबाबत सांगितले आहे. कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही. या कारवाईच्या आधी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण मागण्यात आले नव्हते. पण मी त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. या परिस्थितून मार्ग काढण्यासाठी रामदास तडस आणि काका पवार यांच्यासोबत एकत्र येऊन बैठक घेणार असल्याचे देखील शरद पवार म्हणाले.
विधिमंडळात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची जी संख्या आहे ते पाहता न्यायालयाचा निकाल काय येईल हे सांगता येत नाही. सभागृहात गेल्यावर हे सगळे विचारवंत ( फुटीर आमदार) काय करतील हे सांगता येत नाही. काही जण म्हणतात की सभागृहात गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन होईल. पण मला माहित नाही. सर्वोच्च न्यायालयाची कालची कमेंट गंभीर. गृह मंत्रालयाला जाब विचारण्यात आलाय, असे शरद पवार म्हणाले.