आबांनी मामांना केलं चितपट, आदिनाथ कारखान्यावर शरद पवार गटाचं वर्चस्व, सर्वच 21 जागा जिंकत मारलं मैदान
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची (Adinath Cooperative Sugar Factory Election) संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

Adinath Cooperative Sugar Factory Election : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा (Karmala) तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची (Adinath Cooperative Sugar Factory Election : संपूर्ण राज्यभर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. आज या निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती आले आहेत. यामध्ये पुन्हा काका गटच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच अजित पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा वरचढ असल्याचं पाहायाला मिळालं. शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील (Narayan Patil) यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे (Sanjay mama shinde) यांना चारी मुंड्या चित आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाचे 21 च्या 21 उमेदवार विजयी झाले आहेत.
आमदार नारायण आबा पाटील 2583 मतांनी विजयी
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील 2583 मतांनी विजयी झाले आहेत. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर शरद पवार गटाची एकहाती सत्ता आली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे 21 पैकी 21 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सर्वच जागांवर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील गटाचे 21 उमेदवार विजयी झाले आहेत. शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांची आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर एकहाती सत्ता आली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या महायुतीच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. 21 पैकी 21 जागांवर विजय मिळविल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करमाळा तालुक्यात जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
करमाळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळविलेल्या जोरदार यशा नंतर शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी चक्क गहू निवडण्याच्या मशीन मधूनच गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा जोरदार पराभव करीत विजय घोडदौड सुरू ठेवली आहे .. त्यामुळे या विजयाचा जोरदार जल्लोष करमाळा तालुक्यात दिसत असून या यशामागे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रयत्न फळाला आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
घुमुदे तुतारी तुतारी...! आणखी एका कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेत्याचा धमाका, अजित पवारांच्या विश्वासू नेत्याचा मोठा पराभव























