एक्स्प्लोर

संघाकडून प्रचार पॅटर्न शिका, शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सल्ला

शपथविधीवेळी पाचव्या रांगेचा विषय मोठा नाही, त्यामुळे तो वाद संपवा, अशी प्रतिक्रियाही शरद पवारांनी पिंपरीत घेतलेल्या चिंतन बैठकीनंतर दिली आहे.

पिंपरी :  प्रचार कसा करायचा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडून शिका, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. संपर्कात कसं राहावं, प्रचार कसा करावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांचे काही गुण आत्मसात करायला हवे, असा सूर पवारांच्या बोलण्यात होता. आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाफ चड्डीवाले म्हणून हिणवणारे शरद पवार सर्वांनाच परिचित आहेत. मात्र संघाच्या प्रेमात पडलेल्या शरद पवारांचं आज पहिल्यांदाच दर्शन झालं. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पराभवानंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच पिंपरीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. मतदारसंघातल्या प्रत्येक घराशी दैनंदिन संबंध ठेवण्याचं टार्गेट, संघासाठी आणि पर्यायाने भाजपसाठी काम करणाऱ्या प्रचारकांनी ठेवलं. प्रचाराच्या या पॅटर्नमुळेच ठिकठिकाणी सत्तेचं कमळ फुलताना दिसत आहे. आता संघाच्या प्रचाराचा पॅटर्न पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळवून देणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शपथविधीचा विषय संपवा शपथविधीवेळी पाचव्या रांगेचा विषय मोठा नाही, त्यामुळे तो वाद संपवा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. माझ्या सचिवांनी दोन वेळा विचारणा केली होती, मात्र संबंधित कार्यालयाने पाचवीच रांग असल्याचं म्हटलं होतं, असा पुनरुच्चार शरद पवारांनी केला. एकतर राष्ट्रपती भवन कार्यालयात किंवा आमच्या कार्यालयात त्रुटी असावी, असं पवार म्हणाले. मोदींच्या शपथविधी सोहळ्यात पवारांचा अवमान नाही, गैरसमज! आसनव्यवस्थेवरुन पवारांचा अवमान  नसून गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनातून देण्यात आलं होतं. व्ही हे अक्षर रोमन लिपीतील पाचव्या रांगेचं निदर्शक नव्हतं. तर व्हीआयपीसाठी वापरण्यात आलेला तो कोड होता, असा दावा करण्यात आला होता. VIDEO | मोदींच्या शपथविधीच्या रांगेचा विषय मोठा नाही, तो वाद संपवा : शरद पवार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Lonavala Rain: धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
धोकादायक पाऊस, लोणावळ्यात कलम 163 लागू, 31 जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget