![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shahaji Patil : उजनीच्या उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी बापूंनी फोनवर घेतली अधिकाऱ्याची शाळा, सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल
Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आले असता शेतकऱ्यांनी त्यांना खराब झालेले रस्ते, वीज आणि उजनीच्या पाण्याबाबत अडचणी सांगितल्या. बापूंनी मग तात्काळ उजनीच्या वरिष्ठ शेतकऱ्यांसमोरच शाळा घेतली.
![Shahaji Patil : उजनीच्या उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी बापूंनी फोनवर घेतली अधिकाऱ्याची शाळा, सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल Shahaji Bapu Patil viral video clip on Ujjani dam to release water in video clip went viral on social media. Shahaji Patil : उजनीच्या उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी बापूंनी फोनवर घेतली अधिकाऱ्याची शाळा, सोशल मीडियावर व्हिडीओ क्लिप व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/27/10ed7a5bce193e538c221ba051096dd6166161395186889_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahaji Patil : सांगोला येथील फेमस शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Patil) हे आता पुन्हा एका व्हायरल क्लिपमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. या व्हायरल क्लिपमध्ये बापूंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फोनवरूनच अधिकाऱ्यांची शाळा घेतली आणि उजनीच्या कालव्यातून पाणी वाहू लागले.
अधिवेशन संपल्यावर बापू सध्या आपल्या मतदारसंघात गावोगावी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाहणी करीत फिरू लागले आहेत. आज ते पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आले असता शेतकऱ्यांनी त्यांना खराब झालेले रस्ते, वीज आणि उजनीच्या पाण्याबाबत अडचणी सांगितल्या. बापूंनी मग तात्काळ उजनीच्या वरिष्ठ शेतकऱ्यांसमोरच शाळा घेतली.
उजनी धरणातून हजारो क्युसेक पाणी पूराची भीती टाळण्यासाठी नदीत जात असताना खोडसाळपणा करत उजनीच्या लहान लहान उपकालव्यांना मागणी करूनही पाणी सोडले जात नव्हते हेच वास्तव शेतकऱ्यांनी आज शहाजीबापू यांना दाखवले. त्यानंतर शहाजी बापूंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून पाणी का येत नसल्याचा सवाल करीत तुमच्या हाताखालचे अधिकारी खोड्या करत असल्याचे सुनावले. एका बाजूला पाणी नदीत सोडले जात असताना उजनीच्या लहान लहान कालव्याला पाणी दिले तर उभी पिके जगतील असे सांगत तुमचे अधिकारी आता पाणी मागणीच्या अर्जाचे कारण पुढे करत आहेत. तसे असते तर महिन्यापूर्वीच का शेतकऱ्यांकडे पैसे मागत फिरले नाहीत असा उलट प्रश्न करताच या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याचे आदेश देत असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे बापू या गावातून बाहेर पडण्यापूर्वीच उपरी येथील उजनीच्या 24 अ या उपकालव्यात पाणी खळखळू लागले. शहाजीबापू त्यांच्या रोखठोक स्वभावामुळे अधिकाऱ्यांना नकोसे वाटत असले तरी गोरगरीब शेतकरी मात्र आपली गाऱ्हाणी बापुना सांगताच त्याच जागेवरून स्पीकर फोनवरून आपली शाळा सुरु करतात. त्यामुळे अधिकारीही बापुंना चांगलेच दचकून असतात हे उपरीच्या आजच्या प्रकरणावरून समोर आले. पाणी येताच परिसरातील शेतकऱ्यांनी बापूंच्या फोनवरील संभाषणाची क्लिप सोशल मीडियात चांगलीच व्हायरल केली आहे.
शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल चांगलीच झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील' अशा प्रकारचं शहाजी पाटील यांनी केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. आमदार शहाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. त्यांच्या बोलण्यात ग्राणीण ढंग आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची सातत्यानं चर्चा देखील होत असते. अनेकवेळा त्यांची वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, 2019 मध्ये शहाजी पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेकडे असल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिवसेनेतून निवडून आणलं. त्यामुळंच फडणवीस यांच्यासोबत शहाजी पाटील यांची चांगलीच गट्टी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)