एक्स्प्लोर
सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतील विलेपार्लेमध्ये नियोजित प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. सात शिवसैनिकांचा रत्नागिरीजवळ अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र बुधवारी मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ झालेल्या अपघातात विलेपार्लेतल्या 7 शिवसैनिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्या सर्वांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्यानं उद्धव यांनी विलेपार्लेतली प्रचारसभा रद्द केली.
रत्नागिरीतील भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू, सर्व प्रवासी मुंबईचे
रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील खानू गावाजवळ भरधाव कार झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला होता. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. भरधाव झायलो कार झाडावर आदळल्याने सात जणांचे जागीच प्राण गेले. बुधवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. दरम्यान उद्धव यांची अंधेरीतली प्रचारसभा नियोजित वेळेनुसारच होणार आहे. त्यामुळे अंधेरीतल्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement