एक्स्प्लोर
हजारोंना गंडा घालणाऱ्या 'ट्रू लाईफ'चे 7 एजंट अटकेत
औरंगाबाद : महाराष्ट्रातील हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा केबीसीचा भाऊसाहेब चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात आला असतानाच अल्पावधीत गडगंज पैसे कमावण्याच्या अमिषाने औरंगाबादेतही अशाच प्रकारची लूट सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे.
औरंगाबादेतल्या ट्रू लाईफ या इन्व्हेन्स्टमेन्ट स्कीमचा दुसरा वर्धापन दिन जल्लोषात सुरु होता. अनेकांनी भाषणबाजी केली, मनोगतं व्यक्त केली, पण या कार्यक्रमावर पोलिसांची नजर होती. कार्यक्रमातून लोकांची फसवणूक होत असल्याचं पाहून गुन्हे शाखेनं स्वतः गुन्हा
नोंदवत 7 जणांना जेरबंद केलं.
नाशिकचा दीपक सूर्यवंशी या 'ट्रू लाईफ'चा निर्माता... 3 हजार 700 रुपयांपासून 5 हजार 150 रुपयांपर्यंत गुंतवणुकीची योजना... पैसे गुंतवताच सोन्याची अंगठी दिली जात असे. पण ती अंगठीच रस्त्यावर 50 ते 60 रुपयात मिळणारी असल्याचं समोर आलं आणि बिंग फुटलं.
ट्रू लाईफचं जाळं महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात गेलं. सुमारे 6 हजार गुंतवणूकदार जोडले गेले. त्यांना भरमसाठ आमिषं दाखवली. विशिष्ट मेंबर केले की तुम्ही क्लब मेंबर होता, असं सांगितलं गेलं.
काय होती आमिषं ?
सिल्व्हर क्लबसाठी सफारी सूट
गोल्ड क्लबसाठी टॅब
प्लॅटिनम क्लबमध्ये लॅपटॉप
रुबी क्लबमध्ये बाईक
एम्राल्ड क्लबसाठी कार
डायमंड क्लबसाठी एसयूव्ही
ब्ल्यू डायमंड क्लबसाठी 25 लाखांचं घर
क्राऊन क्लबसाठी सिंगापूर ट्रीप
ट्रू लाईफची संकल्पना ही भाऊसाहेब चव्हाणच्या केबीसीशी मिळती जुळती आहे. महाराष्ट्रात आजवर अनेक ठकसेनांनी लोकांना हातोहात गंडवलं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.. पण त्यानंतरही लोक अशा भामट्यांना बळी पडतात. याचं कारण म्हणजे लोकांना असलेला झटपट पैशांचा हव्यास.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement