एक्स्प्लोर
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यामध्ये निधन
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2009 मध्ये झालेल्या 82 व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
आनंद यादव यांच्या झोंबी, घरभिंती यासारख्या कादंबऱ्या गाजल्या होत्या. झोंबी या आत्मचरित्रासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आणि राज्य पुरस्कारासह एकूण आठ पुरस्कार मिळाले. 'नटरंग' हा चित्रपट आनंद यादव यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता.
आनंद यादव यांचा जन्म कोल्हापुरातील कागलमध्ये झाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केलं आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.
आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या 'संतसूर्य तुकाराम' या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यांना 2009 साली महाबळेश्वरमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारण्यापासून त्यांना वंचित करण्यात आलं होतं.
कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतरही वारकऱ्यांचं समाधान झालं नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली.
आनंद यादव यांची साहित्यसंपदा :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement