एक्स्प्लोर
उस्मानाबादमध्ये पैसे वाटण्याची अफवा, सेना-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यातील मुरुम नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पैसे वाटण्याच्या अफवेवरुन कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त बाचाबाची झाली. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी एकूण 27 जणांवर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
माजी मंत्री शिवशरण बसवराज पाटील यांच्या मुलासह काँग्रेसच्या 18, सेनेच्या 5, राष्ट्रवादीच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील 147 नगरपालिका, 18 नगर पंचायतींसाठी मतदान सुरु
राज्यात आज 147 नगरपालिका आणि 18 नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मात्र तरिही असे प्रकार घडत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटण्याची अफवा पसरल्यामुळे मुरुममध्ये कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
