Bihar पाटणा : अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी बुधवारी म्हणजेच, 21 ऑगस्ट रोजी भारत बंदची हाक दिली होती. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड ट्रायबल ऑर्गनायझेशन नावाच्या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय दलित आणि आदिवासींच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. अशातच, या भारत बंदमध्ये (Bharat Band) सहभागी होत काही संघटनांनी केलेल्या आंदोलनास बिहारच्या पाटणा येथे हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळालं. 


 गैरसमजातून कॉन्स्टेबलने केला लाठीचा वापर


दरम्यान, या आंदोलकांना अटकाव घालण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्जचे करण्याचे आदेश एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी दिले होते. मात्र या लाठीचार्जदरम्यान उपस्थित असलेल्या एसडीएम यांना पोलिसांनी न ओळखल्याने त्यांना यावेळी एका पोलिसांच्या काठीचा नकळत मार बसला. या घटनेमुळे मुळचे मंगळवेढ्याचे रहिवासी असलेले श्रीकांत खांडेकर देशभरात चर्चेत आले आहेत. अजूनही या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रकरणी कॉन्स्टेबलवर नेमकी काय कारवाई होते याकडे सऱ्यांचे लक्ष  लागले असतांना या प्रकरणात कुठलीही कारवाई न करण्याच्या सूचना श्रीकांत खांडेकर यांनी दिल्या आहेत. या वर बोलताना एसडीएमने सांगितले की, कॉन्स्टेबलने आपल्या लाठीचा गैरसमजातून वापर केला होता. ही मानवी चूक आहे. कॉन्स्टेबलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 


नेमकं प्रकरण काय?


बदलापूर शाळेतील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या घटनेवरुन राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून बदलापुरातील घटनेच्या निषेधार्ह आणि राज्यातील महिला भगिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन विरोधी पक्ष आक्रमक बनला आहे. दुसरीकडे 21 ऑगस्ट रोजी देखील भारत बंदची हाक देण्यात आली होती. त्यासही संमिश्र प्रतिसाद देण्यात आला असून बिहारमधील काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. दरम्यान, या आंदोलनावेळी पोलिसांकडून चक्क उपजिल्हाधिकाऱ्यांवरच लाठीचार्ज करण्यात आला. त्यावेळी, उपजिल्हाधिकारीही संबंधित पोलिसावर चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटीझन्स पोलिसांना ट्रोल करत आहेत.


दरम्यान, पांढरा शर्ट घातलेले एसडीएम आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत असताना एका हवालदाराने त्यांना आंदोलक समजून त्यांच्यावर लाठीहल्ला केला. लाठीचा वार होताच आश्चर्यचकित झालेले एसडीएम माघारी फिरले. दरम्यान, शेजारी उभ्या असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हवालदाराला हात देऊन थांबवले. नंतर एसडीएमने सांगितले की कॉन्स्टेबलने आपल्या लाठीचा गैरसमजातून वापर केला होता. ही मानवी चूक आहे. त्यामूळे कॉन्स्टेबलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसल्याचे एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर यांनी सांगितले आहे. 


हे ही वाचा