Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे, पुढील 24 तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा  (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 


आज (23 ऑगस्ट) पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची  (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकण या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता  (Heavy Rain) हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ याठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.


आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट


पुणे, रायगड,ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा  (Heavy Rain) येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशीम, जालना, बीड, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा  (Heavy Rain) अंदाज आहे. 


पुणे शहरात जोरदार मुसळधार पाऊस


पुणे शहरात काल गुरुवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली. काल शहर विजांच्या कडकडाटासह सुमारे दोन तास मुसळधार पाऊस  (Heavy Rain) झाला. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं, तर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 


शहर परिसरात काल(गुरुवारी) सकाळपासून आकाशात पांढऱ्या ढगांनी (क्युम्युनोलिंबस ढगांनी) गर्दी केली होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला  (Heavy Rain) सुरुवात झाली. स्वारगेट, टिंबर मार्केट, गोळीबार मैदान, शिवाजीनगर, लोहगाव, पाषाण, चिंचवड, लवळे या भागात जोरदार पाऊस झाला. तसेच कात्रज, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता, औंध, पाषाण, बाणेर या भागातही मुसळधार पावसाने  (Heavy Rain) हजेरी लावली.


पुणे शहरात विकेंडला ऑरेंज अलर्ट


पुणे शहरासह घाटमाथ्यावर मान्सून सक्रिय झाला असून, शहरावर गेल्या तीन दिवसांपासून क्युम्युनोलिबस ढगांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कमी काळात मोठा पाऊस होत असल्याची माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. शहराला 23 व 26 या दिवशी येलो, तर 24 व 25 रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.