एक्स्प्लोर
Advertisement
देशातील राजकीय आरक्षण बंद करा : आनंदराज आंबेडकर
देशातील राजकीय आरक्षण बंद करुन टाका, राजकीय आरक्षणाने समाजाचा फायदा नाही, असं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नांदेड: देशातील राजकीय आरक्षण बंद करुन टाका, राजकीय आरक्षणाने समाजाचा फायदा नाही, असं रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.
देशात एससी, एसटी, ओबीसी आणि अन्य राजकीय आरक्षणे आहेत, ती राजकीय आरक्षणे काढून टाकण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केली. अशा राजकीय आरक्षणातून विधानसभेत आणि लोकसभेत किंवा अन्य कोणत्याही सभागृहात गेलेले लोकप्रतिनिधी हे सर्व मतदारांचे आणि त्या त्या पक्षाचे असतात. त्यामुळे समाजाचा काहीही फायदा होत नाही. हीच भूमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. आपण या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे, असं आनंदराज आंबेडकर म्हणाले.
दुसरीकडे आनंदराज आंबेडकर यांनी एमआयएम आणि भारिप युतीला भाजपची बी टीम म्हणणे ही मानसिकता चुकीची असल्याचं म्हटलं आहे.
भाजपला विरोध करणाऱ्यांनी काँग्रेससोबत जावे आणि काँगेसला विरोध करणाऱ्यांनी भाजपसोबत जावे अशी अपेक्षा चुकीची आहे. ज्यांना ज्यांची विचारधारा पटते ते एकमेकांसोबत असतात. आमचा पक्ष हा वंचित आघाडीसोबत जाणार असल्याचंही आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली- आनंदराज आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement