एक्स्प्लोर

राज्यात आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु; पालकांचं संमतीपत्र बंधनकारक

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मात्र, करोना परिस्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.

मुंबई : तब्बल दहा महिन्यानंतर पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आजपासून शाळेची घंटा पुन्हा एकदा ऐकू आली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आले होते आणि आजपासून दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला. मात्र, करोना परिस्थिती पाहता महापालिका आणि जिल्हा स्तरावर शाळांबाबत निर्णय घेण्याची मुभा सरकारने दिली होती. त्यानुसार आज शाळा सुरु होत आहेत.

पालकांचं संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये अनेक उपाययोजना करणं गरजेचं आहे. विद्यार्थी आणि कमर्चाऱ्यांचं थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिमीटर तपासणी यांसारख्या सुरक्षा उपायांचं पालन शाळांमध्ये करावं लागणार आहे.

मुंबई मध्ये मात्र अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. बीएमसीने 16 जानेवारी रोजी पुढील माहिती मिळेपर्यंत शाळा पुन्हा सुरू न करण्याचे निर्देश दिले आहेत. पण राज्यातील इतर भागांत मात्र शाळा आजपासून सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, पालघरमध्ये आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यात येत आहेत.

पाहा व्हिडीओ : राज्यात आजपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु

पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा सुरु करण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. मात्र सुरक्षेचे सगळे निकष पूर्ण करणाऱ्या 60 ते 65 शाळाच आज पहिल्या दिवशी सुरु करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलाढाण्यातील 5वी ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. शहरातील शारदा ज्ञानपीठ या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर करण्यात येत आहेत. पहिलाच दिवस असल्यानं विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तसं पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचं शिक्षक सांगत आहेत.

नाशिकमध्ये आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांची उपस्थिती

नाशिक जिल्ह्यातील 2825 शाळा आजपासून खुल्या करण्यात आल्या असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसह शाळा प्रशासनाकडूनही सर्व खबरदारी घेतली जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. मधली सुट्टी होणार नसल्यानं विद्यार्थ्यांना घरूनच जेवण करून शाळेत यावं लागणार आहे. दरम्यान शाळा ऑफलाईन सुरु झाल्यानं विद्यार्थी आणि पालकवर्गाकडूनही समाधान व्यक्त केलं जातंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray : 'तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे', थेट इशारा
Uddhav Thackeray : 'मतचोरीचा लाभ कोणी घेतला? मुख्यमंत्र्यांनी पर्दाफाश करावा'- ठाकरे
Uddhav Thackeray : 'कुटुंबियांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा डाव होता का?', गंभीर आरोप
Pune Gang War: 'आंदेकर टोळी अजूनही सक्रिय', गणेश काळेच्या हत्येने पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान!
Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार
Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद राहणार, सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raj Thackeray: कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीमधील 4500 मतदारांनी मलबार हिलला सुद्धा मतदान केलं! अशा लाखो लोकांचा महाराष्ट्रात मतदानासाठी वापर, राज ठाकरेंनी नावासकट पुरावा दिला!
Uddhav Thackeray Speech : मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
मतचोर जिथे दिसेल त्याला जागेवरच फटकवा, उद्धव ठाकरेंचे आवाहन, निवडणूक आयोगालाही इशारा
Satyacha Morcha Mumbai: फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालय...मनसे अन् महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
फॅशन स्ट्रीट ते BMC मुख्यालय...मनसे-महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा; गर्दी किती?, पाहा Photo's
Raj Thackeray : मलबार हिलमध्ये कल्याण ग्रामीण, भिवंडीसह मुरबाडच्या 4500 जणांच मतदान, दुबार मतदारांच्या संख्येचा पाढा वाचला, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मतदार यादीवर काम करा, दुबार तिबार सापडल्यास फोडून काढा,पोलिसांच्या ताब्यात द्या : राज ठाकरे
MVA ans MNS Mumbai Morcha: आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
आमची सत्ता रस्त्यावर! राज अन् उद्धव ठाकरेंची बऱ्याच वर्षांनी खांद्याला खांदा लावत 'मनसे' एकीची वज्रमूठ; निवडणूक आयोगाला गर्भित इशारा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
केरळ अत्यंत गरिबी दूर करणारे देशातील पहिले राज्य; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget