एक्स्प्लोर
सांगलीत स्कूलबसला अपघात, सर्व मुलं जखमी
सांगली : सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यात स्कूलबस पलटी झाली आहे. या बसमधील सर्व मुलांना मुकामार लागला आहे, तर जवळपास 12 मुलांना किरकोळ इजाही झाली आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील चिंगुआई संस्थेच्या नुतन इंटरनॅशनल स्कूलची बस आगळगाव ओढ्याजवळ पलटी झाली. अपघातावेळी बसमध्ये जवळपास 40 लहान मुलं होती. बस ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर बसचा ड्रायव्हर पसार झाला आहे.
अपघातावेळी ड्रायव्हर बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचंही समोर आलं आहे. शाळा प्रशासनाकडून स्कूलबसमध्ये कोणीही केअर टेकर नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement