मुंबई : ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचा धोका पाहता देशात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जात आहेत. अशामध्ये शिक्षण विभागाकडून 25 नोव्हेंबर रोजी पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा राज्यभरात सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याचं काय करणार ? याकडे लक्ष होते. मात्र शिक्षण विभाग 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिली सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत ठाम असून याबाबत आज शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयाची वाट शिक्षक, पालक व महापालिका, नगरपालिका शिक्षण अधिकारी, आयुक्त सर्वच जण पाहत होते
सुरक्षिततेच्या उपाययोजना जरी केल्या जात असतील तरी सध्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचं कोव्हीड टास्क फोर्स कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने शासन निर्णय व आदेश जारी केले आहेत. त्याचे शाळांमध्ये काटेकोरपणे पालन केल्यास या विषाणूचा धोका फारसा नसल्याचेही डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय, या विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून अभ्यास सुरू आहे . तर काही शिक्षक संघटना व पालकांच्या मते शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत फेर विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात यावा, असे मत मांडले आहे. तर नाशिक महापालिकेने आपल्या स्तरावर 10 डिसेंबर पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहावे लागणार आहे. मात्र, सध्यातरी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून शाळांना देण्यात आले आहेत
काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना?
- दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे
- शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे
- वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
- शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
- शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये
- शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
- ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी
- मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे
- क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
- शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
- शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे
- शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये
- यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
- एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी
- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे
- शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
- या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत. त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
- पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल
संबंधित बातम्या :
Maharashtra School News: एक डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यास हरकत नाही, चाइल्ड टास्क फोर्स
School : शाळांबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी; मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि 'या' नियमांचं पालन करावं लागणार