Maharashtra School Reopen : एक डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही, ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत पालक शिक्षकांनी घाबरून न जाता मुलांना शाळा सुरू झाल्यावर शाळेत पाठवावे, असे आवाहन चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं आहे.
डॉ. बकुळ पारेख म्हणाले की, ‘मागील आठवड्यात जी बैठक झाली त्यामध्ये आम्ही शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला. त्यानंतर आम्ही हा सुद्धा विचार केला होता की अशा प्रकारचा व्हेरिएंट आला तर काय ? आता हा व्हेरिएंट जगात आलाय तर त्याबाबत डेटा कलेक्ट करणे, त्याबाबत रिसर्च अभ्यास करणे सुरू आहे. पण सध्यातरी शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही.’ काही सदस्यांचा असं म्हणणं आहे की, आपण परिणामाची वाट पाहू नंतर डिशिजन घेऊ. यामध्ये कुठलाही भीषण असुदे तुम्ही योग्य ते नियम पाळले तर त्यापासून आपण बचाव करू शकतो. माझं स्वतःचं वैयक्तिक असं म्हणणं आहे की आता शाळा सुरु करावी त्यानंतर परिस्थिती पाहून रिअसेस करता येईल. या परिस्थितीबाबत आम्ही या आधी सुद्धा विचार केला होता. ज्यामध्ये अशाप्रकारे कोणता नवा व्हेरिएंट आला आणि त्यानं जर लहान मुलांवर परिणाम केला तर त्यानुसार पुनर्विचार करून निर्णय बदलावा लागेल. त्यात सध्या तरी कुठल्याही नव्या गाईडलाईन्स देण्याची गरज वाटत नाही, कारण इन डिटेल गाईडलाईन्स यादी देण्यात आली आहे, असं पारेख म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरिएंटची सुक्ष्म लक्षणं असल्याचं दक्षिण आफ्रिकन असोसिएशननेही सांगितलं आहे. त्यामुळे पालकांनी कुठले प्रकारचा संभ्रम मनात बाळगू नये, भीती ठेवून काही होणार नाही. कोरोना निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करा मुलांना शाळेत पाठवा, असे आवाहन पारेख यांनी केलं.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Omicron Variant : ओमिक्रॉन व्हेरिएंट अलर्ट; टेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग धोरण वापरणं योग्य, तज्ज्ञांचं मत
Omicron Variant : राज्यात शाळा सुरू होणार का?; विद्यार्थ्यांसह शिक्षक पालकांमध्ये संभ्रम