एक्स्प्लोर

राज्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये औषधांचा अभूतपूर्व तुटवडा

राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधं सध्या नसल्यात जमा आहेत. याला राज्य सरकारचं बदललेलं धोरण जबाबदार आहे. हतबल झालेलं रुग्णालय प्रशासन औषधे 'लोन'वर द्या, अशी पत्रे एकमेकांच्या व्यवस्थेला लिहित आहेत.

नागपूर : नियोजनाचा अभाव असेल तर चांगल्या निर्णयाचेही तीन तेरा कसे वाजू शकतात याचं उदाहरण समोर आलं आहे. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधं सध्या नसल्यात जमा आहेत. याला राज्य सरकारचं बदललेलं धोरण जबाबदार आहे. हतबल झालेलं रुग्णालय प्रशासन औषधे 'लोन' वर द्या, अशी पत्रे एकमेकांच्या व्यवस्थेला लिहित आहेत. प्रत्येक सरकारी दवाखान्याच्या बाहेर अनेक औषधाची दुकानं असतात. पण सध्या औषधांच्या तुटवड्यामुळे मेडिकलसमोर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी दिसून येते. स्वस्तात ट्रीटमेंट होणार, स्वस्तात औषधे मिळणार म्हणून रुग्ण दुरदुरून शासकीय वैद्यकीय सेवा घ्यायला येतात. पण तिथे आल्यावर फरफट होत आहे. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करायला सांगितलं जात आहे. एकही औषध सरकारी दवाखान्यात मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. कमी खर्चात उपचार होणार म्हणून आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना दररोज मानसिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. नागपूरच्या शासकीय रुग्णालयाची स्थिती राज्याच्या तुलनेत चांगली असल्याचा दावा केला जात आहे. कारण, हे एकमेव असं शासकीय रुग्णालय आहे, ज्याने जीआर आल्यानंतर आणि तो लागू व्हायच्या 4 दिवसाच्या फरकात मोठ्या प्रमाणात औषध साठा विकत घेतला, जो बराच काळ पुरला. नागपूरसारख्या अगोदरच औषध साठा घेऊन ठेवलेल्या रुग्णालयात जर ही परिस्थिती आहे, तर उर्वरित राज्याची परिस्थिती यापेक्षा किती तरी वाईट असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. औषध खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि विकेंद्रीकरणाला आळा बसावा म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जीआर काढला, की सर्व शासकीय औषधे आणि उपकरणांची खरेदी हॉपकिन्स इन्स्टिट्यूट अंतर्गत गठीत केलेली समिती करणार. शासकीय दवाखान्याने वर्षाला लागणाऱ्या औषधांची यादी आणि आपल्या बजेटचे 90 टक्के पैसे हे या समितीला ट्रान्स्फर करायचे होते. हे झालं, पण अनेक तांत्रिक अडचणींमुळे हॉपकिन्स पुढे औषधे विकत घेऊ शकले नाही. त्यामुळे आम्हाला औषधाचे 'कर्ज' द्या अशी पत्र वैद्यकीय रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना एकमेकांना लिहिण्याची वेळ आली आहे. या परिस्तिथीला नियंत्रणात आणण्याचा अयशस्वी प्रयत्न नुकताच सरकारने केला. जोपर्यंत हॉपकिन्सच्या रेट कंत्राटच्या अडचणी दूर होत नाही, तोपर्यंत या व्यवस्थांनी आपापली औषधे खरेदी करावी, असे आदेश दिले. पण एकीकडे अनेकांनी आपल्या बजेटचे पैसे आधीच ट्रान्सफर केल्यामुळे आणि दुसरीकडे शासनाचे पैसे अनेक ठिकाणी पूर्ण मिळाले नसल्यामुळे औषध खरेदीची मुभा मिळूनही आता औषधं विकत घेतली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारनेच यावर आता तोडगा काढण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole: राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो, वेळेच्या पुढे आणि नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण करत नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य
Maharashtra Breaking LIVE Updates:सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचुक यांना शिवसेना ठाकरे गटाकडून पाठिंबा; दादर येथील छ.शिवाजी पार्क परिसरात आज आंदोलन
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget