एक्स्प्लोर
साताऱ्यात मगरीवर बसून सेल्फी काढणाऱ्या एकाला अटक

सातारा : साताऱ्यात मगरीसोबत सेल्फी काढणाऱ्या दोघांना अखेर अटक झाली आहे. 'एबीपी माझा'ने मगरीसोबत सेल्फी काढणाऱ्यांची बातमी दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. सेल्फीप्रेमींचा उतावीळपणा अनेकदा त्यांच्या जीवावर आला आहे. मात्र तरीही सेल्फीचं फॅड कमी होताना दिसत नाही. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला. कण्हेर धरणाच्या परिसरात मगर असल्याचं गावकऱ्यांना समजलं. यावेळी तरुणांनी मगर पाहण्यासाठी धाव घेतली. यावेळी सुस्त पडलेल्या मगरीसोबत अनेकांनी टिंगल टवाळ्या सुरु केल्या. कोणी मगरीला हात लावून हूसकवत होतं तर कोणी सेल्फीची हौस पुरवून घेतं होतं. एका दीड शहाण्यानं तर कमालच केली. चक्क मगरीवर बसून स्टंट करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एका तरुणाच्या हाताला गंभीर जखमही झाली आहे. अशा स्टंटबाजीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींकडून झाली होती.
पाहा व्हिडिओ :
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















