एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शौचालय नसल्यामुळे सरपंचपद गमावलं
पिंपरी चिंचवडः घरात शौचालय असण्याचे अनेक फायदे आपल्याला माहित आहेत. मात्र शौचालय नसल्यानं एखाद्याचं केवढं नुकसान होऊ शकतं हे पिंपरीतल्या माण गावात दिसून आलं आहे. एका सरपंचाला घरात शौचालय नसल्यामुळे आपल्या खुर्चीवरुन पायउतार व्हावं लागलं आहे.
आयएसओचा दर्जा असलेल्या आणि विकासाचं परिपूर्ण मॉडेल म्हणून गौरवलेल्या माण ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. स्मिता भोसले असं सरपंचाचं नाव आहे. निवडणुकीच्या वेळी घरात शौचालय नसतानाही, शौचालय असल्याची मारलेली थाप स्मिता भोसले यांना चांगलीच महागात पडली आहे.
निवडणुकीपूर्वी केलेली चतुराई भोवली
2015 च्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीपूर्वी जुलैमध्ये सरपंचपदाच्या उमेदवार स्मिता भोसले यांनी घरात शौचालय असल्याचा पुरावा दिला होता. मात्र सरपंचपदावर विराजमान झाल्यानंतर 22 सप्टेंबर 2015 रोजी स्मिता यांचे पती सागर भोसले यांनी शौचालयाच्या अनुदानासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला.
खुर्चीचा वापर करून केलेली ही चतुराई यशस्वी झाली असं वाटत असतानाच, त्यांचा हा डाव विरोधी पक्षाचे सदस्य राजेंद्र भोसले यांनी हाणून पाडला. त्यांच्या तक्रारीनंतर भोसलेंवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचांनी मात्र हा अन्याय असल्याचं सांगितलं आहे.
राजेंद्र यांनी यावर आवाज उठवताच नोंद करण्यात आलेल्या प्रोसेडिंग बुक वर ग्रामसेवक बाबासाहेब कुठे यांच्या मदतीनं खाडाखोड करण्यात आली आणि सागर भोसले यांच्या ठिकाणी त्यांचे भाऊ चंद्रकांत भोसले यांचं नाव लावण्यात आलं. मात्र ही लबाडीही फुटली आणि ग्रामसेवकाला जेलमध्ये जावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement